शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या पर्यावरण सहलीवर पिंपरी महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:10 IST

महापालिकेच्या वतीने विकसित केलेल्या पर्यावरण संस्कार आणि आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांमध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन केले जाणार आहे.

पिंपरी : अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या सहलींवर कोट्यवधींचा खर्च केला जात असताना विद्यार्थ्यांच्या सहलींवर खर्च केला जात आहे. महापालिकेच्या वतीने विकसित केलेल्या पर्यावरण संस्कार आणि आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांमध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन केले जाणार आहे. सहलीचे आयोजन करणाऱ्या कोथरूडमधील संस्थेवर एक कोटी रुपये खर्च होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान, वृक्ष संवर्धन विभागामार्फ त विविध प्रकारची  १७८ उद्याने विकसित केलेली आहेत. त्यामध्ये पर्यावरणविषयक बाबींचे समावेश असलेले पर्यावरण संस्कार उद्यान व आयुर्वेदिक वनऔषधी उद्यान विकसित केली. या उद्यानातील पर्यावरणविषयक बाबींची जनजागृती व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या पाचवी ते नववी आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कोथरूडमधील निसर्ग जागर प्रतिष्ठान या संस्थेमार्फ त सहलींचे आयोजन केले जाते. आता महापालिका शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना या पर्यावरण संस्कार उद्यान व आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांची माहिती दिली जाणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सन २०१९-२० या वर्षांत महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निसर्ग जागर प्रतिष्ठान मार्फ त सहलींचे आयोजन केले जाते. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च होणार आहे. पर्यावरण जागृती फलकांसाठी ५० लाखांचा खर्च महापालिकेच्या शहरातील १७८ उद्यानांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने वेगेवगळ्या आकाराचे फलक लावणार आहे. निसर्ग जागर प्रतिष्ठानमार्फ त फलक बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च होणार आहे. शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी २५० लोखंडी बाकडे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च होणार आहे. महापालिका हद्दीत एकूण १७५ उद्याने आहेत. या उद्यानांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येतात. नागरिकांच्या सोयीसाठी उद्यानांमध्ये ठिकठिकाणी लोखंडी बाकडे बसविण्यात येतात. महापालिका उद्यान विभागामार्फ त नव्याने २५० लोखंडी बाकडे खरेदी करण्यात येणार आहेत. हे बाकडे कष्टमाईज्ड फ्रॅब्रिकेटेडचे असणार आहेत. त्यासाठी ठेकेदारांकडून ऑनलाईन निविदा दर मागविण्यात आले. पुनर्प्रत्ययी आदेशानुसार, कमी दराने म्हणजेच ४९ लाख ६१ हजार रुपये दराने निविदा सादर केलेल्या रेखा इंजिनिअरिंग वर्क्स या ठेकेदाराला कामाचा आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही मान्यता दिली. त्यानुसार, करारनामा करण्यासाठी मान्यता देण्यास स्थायी समितीनेही मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडenvironmentवातावरणSchoolशाळा