शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेचे 'होऊ द्या खर्च' :क्रीडा स्पर्धेवर उधळले सव्वा कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 18:23 IST

उपमहापौर तुषार हिंगे यांनी स्पर्धेची अंतिम फेरी, बक्षीस वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षक होण्याचा हट्ट धरला आहे. त्यासाठी आवश्यक विद्युत स्पिकर, लाईट, तसेच माईक व्यवस्था आदींची व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिका ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडे देण्यात आली आहे.

पिंपरी : महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धेवर उधळपट्टी सुरू असून, सांस्कृतिक कार्यक्रमांचा हट्ट उपमहापौरांनी केल्याने स्पर्धेचा खर्च २० लाखांनी वाढला आहे. त्यामुळे सव्वाकोटी रुपये खर्च केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचा समारोप बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये होणार आहे. स्पर्धेसाठी प्रायोजक शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले. त्यानंतर ठेकेदारांचे भले करणाऱ्या महापालिका प्रशासनाने शब्द फिरवित महापालिकेचर भार टाकला आहे. सुरुवातीलाच स्पर्धेसाठी ६५ लाख रुपयांचे गणवेश किट खरेदी केले. अन्य खर्चासाठी सुमारे ६७ लाख रुपये खर्च आला. त्यातील ३० लाख रुपये एस्पायर इंडिया या कंपनीने उभे केले आहेत. उर्वरित ४७ लाख रुपये महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे या कोट्यवधींचा खर्च होत आहे. उपमहापौर तुषार हिंगे यांनी स्पर्धेची अंतिम फेरी, बक्षीस वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षक होण्याचा हट्ट धरला आहे. त्यासाठी आवश्यक विद्युत स्पिकर, लाईट, तसेच माईक व्यवस्था आदींची व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिका ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडे देण्यात आली आहे.

आता बक्षीस वितरणास खर्चत्याची पाहणी करून उपमहापौरांनी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आकर्षक रंगीत प्रकाश व्यवस्था, जसे की पार लाइट, ब्लायंडर लाइट, शार्पी लाइट, ट्रससह स्पिकर अशी महागडी व्यवस्था, तसेच सीसीटीव्ही व्यवस्था करावी. त्यासाठी स्वतंत्र जनरेटरसह विद्युत व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठी अंदाजे १८ लाख ३६ हजार ८५४ रुपये इतका खर्च येणार आहे. या व्यतिरिक्त इंधनासह जनरेटरसाठी स्वतंत्र १ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे उपमहापौरांच्या या हट्टामुळे महापौर चषक स्पर्धेचा खर्च १९ लाख ३६ हजार ८५४ रुपयांनी वाढणार आहे.

सर्व काही थेट पद्धतीने स्पर्धेच्या कामाची तातडी लक्षात घेता निविदा प्रसिद्ध न करता थेट पद्धतीने ‘सांस्कृतिक व कलाधोरण’ या लेखाशिषावरून हा खर्च केला जाणार आहे. परिणामी, महापौर चषक स्पर्धेचा खर्च सुमारे १ कोटी ३६ लाखांवर पोहचला आहे. पदाधिकाऱ्यांचा हट्ट पुरविण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी  घातला आहे. त्यामुळे फुटकळ बचतीचे धोरण राबवून स्वत:ची पाठ थोपटण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर टीका होत आहे.

टॅग्स :BJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड