शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेमध्ये गदारोळातच झाला संतपीठाचा विषय मंजूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:36 IST

टाळगाव चिखली येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठा'चा विषय गदारोळातच मंजूर झाला...

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे महापौरांच्या आसनासमोर आंदोलन सभा एक तासासाठी तहकूब राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक ; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठा'चा विषय गदारोळातच महापौर राहुल जाधव यांनी मंजूर केला. त्यामुळे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक होत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. गोंधळ सुरू असताना सभा तहकूब न करता महापौर जाधव खुर्ची सोडून उठून गेले. महापालिकेची जानेवारी महिन्याची तहकूब सभा सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव आहेत. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर आंदोलन केले. नगरसेवकांनी संत पीठात भ्रष्टाचार झाल्याचे फलक हातामध्ये घेतले होते. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, राजू बनसोडे, समीर मासुळकर, माजी महापौर मंगला कदम, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते दत्ता साने संत पीठावर बोलत होते. विकासकामतील होणाया रिंग बाबत बोलत असताना माजी महापौर नितीन काळजे यांनी त्यांना मध्येच अडविले. साने यांनी संत पीठावर बोलावे, असे काळजे म्हणाले. त्यानंतर साने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी  महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. महापौरांसोबत वादावादी सुरू असतानाच महापौर जाधव यांनी अचानक संत पिठाचा विषय मंजूर केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.सभा तहकूब केल्याचे जाहीर न करताच महापौर राहुल जाधव खुर्चीवरून उठून गेले. दरम्यान, सभा एक तास तहकूब केल्याचे नगरसचिवांनी सांगितले.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsant tukaramसंत तुकाराम