शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत कोरोना नियमांची पायमल्ली! विनामास्क फिरणाऱ्या २९८ जणांवर पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 16:30 IST

नागरिकांचे नियमांकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देएकामुळे संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता

पिंपरी: शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची विचारपूसही केली जात आहे. तरीही नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा विनामास्क फिरणाऱ्या २९८ जणांवर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. 

कोरोनावर मात करण्यासाठी मास्क हे शस्त्र असल्याचे तज्ञ सांगत आहेत. मास्कमुळे अजूनही लोक या आजारापासून सुरक्षित आहेत. पण काहींना याबाबतचे गांभीर्य नसल्याने ते मास्क घालत नाहीत. नंतर स्वतःसहीत संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत. दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नियमांबाबत प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. म्हणूनच नागरिकांनी घरातच थांबून निर्बंध व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत आहे. दरम्यान काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. तसेच काही वाहनचालक मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येते. अशीच वागणूक राहिल्यास नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई

एमआयडीसी भोसरी (४८), भोसरी (०८), पिंपरी (०९), चिंचवड (२३), निगडी (०७), आळंदी (१७), चाकण (०७), दिघी (०६), सांगवी (१९), वाकड (१२), हिंजवडी (२९), देहूरोड (३२), तळेगाव दाभाडे (१६), चिखली (१७), रावेत चौकी (१३), शिरगाव चौकी (२४), म्हाळुंगे चौकी (११) या पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार