शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad : महापालिकेत यंग ब्रिगेडचा बोलबाला; नगरसेवकांचे सरासरी वय ४५ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:11 IST

- नव्या सभागृहात २१ ते ४९ या वयोगटातील ६८.७५ टक्के नगरसेवक; युवा पिढीसोबतच अनुभवी ज्येष्ठांचा साधला जाणार समतोल, तब्बल तीन वर्षांनी नगरसेवकांचा सभागृहात होणार प्रवेश

- आकाश झगडेपिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी तरुणांसह ज्येष्ठ अनुभवी सदस्यांची निवड केली आहे. सभागृहात अनुभवी आणि तरुण अशा दोन्ही पिढ्यांचा समतोल दिसून येतो. १२८ नगरसेवकांच्या सभागृहात सदस्यांचे सरासरी आयुर्मान ४५ वर्षे असून, तरुणाईचा बोलबाला असणार आहे.शहरात सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करताना ज्येष्ठ, अनुभवी सदस्यांसह तरुणांनाही पसंती दिली होती. प्रभाग ३० मधील प्रतीक्षा लांघी-जवळकर या २३ वर्षाच्या सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत. दीप्ती कांबळे यांचे वय २४ वर्षे असून, यश साने व सिद्धार्थ बनसोडे हे दोघे २५ वर्षांचे तरुणही विजयी झाले आहेत.दरम्यान, महापालिकेच्या नव्या सभागृहातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तरुण नगरसेवकांकडून आधुनिक दृष्टिकोन, नव्या संकल्पना, गतिमान कामकाजाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच अनुभवी सदस्यांच्या मार्गदर्शनामुळे निर्णयप्रक्रियेत स्थैर्य येईल. विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष केंद्रीत राहील, अशी अपेक्षा आहे.-------तरुणाईचा उत्साह आणि जुन्यांच्या अनुभवाचा समन्वयतरुणाईचा उत्साह आणि अनुभवी सदस्यांचा अनुभव यांचा समन्वय साधत महापालिकेचे कामकाज अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देणे, पारदर्शक प्रशासन आणि जबाबदार कारभार याकडे नव्या सभागृहाचे लक्ष राहणार आहे.------वयोगटानुसार अशी आहे आकडेवारी२१ ते २९ वयोगटातील आठ जणांनी यश मिळविले आहे. ३० ते ३९ मधील २९ आणि ४० ते ४९ वयोगटातील सर्वाधिक ५१ नगरसेवक निवडून आले आहेत. २१ ते ४९ या वयोगटात ६८.७५ टक्के नगसेवक आहेत, यामुळे सभागृहात तरुणाईची संख्या मोठी आहे. ५० ते ५९ या वयोगटातील ३३ नगरसेवक जिंकले आहेत. साठ वर्षांच्या पुढील सात ज्येष्ठ सदस्य दिसणार आहेत.-----सभागृहात तिशीच्या आतील आठ नगरसेवकमागील निवडणुकीमध्येही अनेक तरुण सदस्यांना संधी मिळाली होती. परंतु, त्यातील अनेकांनी सभागृहात फारसा प्रभाव टाकला नव्हता. अनेकवेळा चर्चेमध्ये ज्येष्ठ नगरसेवकच जास्त वेळ भाग घेतात. आता सभागृहात आठ नगरसेवक तिशीच्या आतील आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र येऊन काम करतील, अशी अपेक्षा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.-----वयोमानानुसार नगरसेवकवयोगट           संख्या         टक्केवारी२१ ते २९          ०८         ६.२५%३० ते ३०          २९          २२.६५%४० ते ४९           ५१         ३९.८५%५० ते ५९           ३३         २५.७८%६० च्या पुढे         ७              ५.४७%------सर्वांत तरुण नगरसेवकनाव                                      वयप्रतीक्षा लांघी-जवळकर             २३दीप्ती कांबळे                          २४यश साने                                २५सिद्धार्थ बनसोडे                       २५शिवानी नरळे                           २८अर्चना कारंडे                            २८ऐश्वर्या तरस                              २९--------सर्वांत ज्येष्ठ नगरसेवकनाव                            वयअनुराधा गोरखे              ६८हिराबाई घुले                  ६६शैलजा मोरे                     ६५स्वाती काटे                     ६५सविता आसवानी             ६२योगेश बहल                    ६२कृष्णा सुरकुले                  ६१------

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Chinchwad Corporation: Young Brigade Dominates; Average Age 45

Web Summary : Pimpri Chinchwad Municipal Corporation sees a blend of youth and experience. The average age of corporators is 45, with a significant young presence. Voters favored both seasoned and fresh faces, expecting dynamism and stability in city development, focusing on infrastructure and essential services.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र