पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून 7 वाहनांची तोडफोड

By Admin | Updated: January 4, 2017 14:07 IST2017-01-04T14:07:05+5:302017-01-04T14:07:05+5:30

शहरात वाहन तोडफोड आणि जाळपोळीचे सत्र नव्या वर्षातही सुरू आहे.

In Pimpri Chinchwad, seven vehicles were destroyed by the criminals | पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून 7 वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून 7 वाहनांची तोडफोड

ऑनलाइन लोकमत

पिंपरी चिंचवड, दि. 4 - शहरात वाहन तोडफोड आणि जाळपोळीचे सत्र नव्या वर्षातही सुरू आहे. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी काळेवाडी, तापकीर चौक परिसरात लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
 
महापालिका निवडणूक लढवू इच्छिणा-या एकाचा फलक फाडल्यामुळे कालेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 
काळेवाडी, तापकीर चौक येथे नागरिकांनी राहत्या घरासमोर वाहने अभी केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड केली. यामध्ये चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी अशा सात वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, वाहन तोडफोड, जाळपोळीच्या घटना यापूर्वीही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
 

Web Title: In Pimpri Chinchwad, seven vehicles were destroyed by the criminals