शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

पिंपरी-चिंचवडकरांवर ओढवणार पाणीकपातीचे संकट, धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा ६५० मिमी कमी पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 13:33 IST

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही

ठळक मुद्देपवना धरणक्षेत्रात १ जूनपासून १५ जुलैपर्यंत फक्त ४२५ मिमी पावसाची नोंद

पिंपरी : कोरोना पाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्याचे संकट ओढवणार असल्याचे दिसून येत असून, पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. गतवर्षी १०७५ मिमी पाऊस पडला होता. त्यातुलनेत यंदा ४२५ मिमी पाऊस पडला आहे. ६५० मिमी कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट शहरवासीयांवर राहणार आहे.औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरास मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणीवाटप करण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला होता.  अजूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. पवना धरणक्षेत्रात १ जूनपासून १५ जुलैपर्यंत फक्त ४२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दीड महिन्यात ५.८४ टक्क्यांनी साठ्यात वाढ झाली आहे. धरणात सध्या ३४.१८ टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजपर्यंत १०५ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर ४२.१८ टक्के साठा होता. त्यामुळे साडेसहाशे मिमी पाऊस कमी झाला आहे. आठ टक्क्यांनी धरणात साठा कमी आहे...........................तूर्तास कपात वाढविणार नाहीमहापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सहायक आयुक्त रामदास तांबे म्हणाले, पवना धरणक्षेत्रात पाऊस पडत आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी आहे, हे वास्तव आहे. परंतु, पवना धरणातील साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तूर्तास अतिरिक्त कोणतीही पाणीकपात वाढविली जाणार नाही. ऑगस्टपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेऊ................................. धरणक्षेत्रात कमी पावसाची नोंद दीड महिन्यात पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. धरणक्षेत्रात १५जुुलैपर्यंत ४२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दीड महिन्यात ५.८४ टक्क्यांनी साठा वाढला असून, धरणात ३४.१८ टक्के साठा आहे. गतवर्षी धरणात ४२.१८ टक्के साठा होता. गेल्यावर्षी साडेसहाशे मिमी अधिक पाऊस झाला होता. दोन महिने पुरेल एवढा हा साठा आहे. सध्या पाण्याची काटकसर करण्याची आवश्यकता नाही. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरी आहेत. उद्योग बंद आहेत. पण, घरगुती पाणीवापर वाढला आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांना पाणी कमी पडू दिले नाही.-एम. ए. गडवाल, शाखा अभियंता, पवना धरण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसWaterपाणी