शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड पोलिस करणार एआय आधारित निगराणी

By नारायण बडगुजर | Updated: January 25, 2026 18:35 IST

- एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास उच्चस्तरीय समितीची मान्यता

पिंपरी : गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षेला नवे बळ देणाऱ्या एआय आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी अखेर शासनाच्या उच्चस्तरीय समितीची (एचपीसी) मान्यता मिळाली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्याने शहराच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी झेप अपेक्षित आहे.

वेगाने नागरिकरण होत असलेले पिंपरी-चिंचवड, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि आयटी हब यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील बनत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाने तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर भर देत हा शहरव्यापी सीसीटीव्ही प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मिशन आणि महापालिकेमार्फत आधी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे एकाच एकात्मिक प्रणालीत जोडले जाणार आहेत. तसेच, महत्त्वाच्या आणि अद्याप कव्हरेज नसलेल्या भागांत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विशेषतः चाकण, तळेगाव आणि भोसरी एमआयडीसी, तसेच हिंजवडी आयटी हब येथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवली जाणार आहे.

देहू व आळंदी या तीर्थक्षेत्रांमध्ये, तसेच सण-उत्सव व पालखी मिरवणुकीदरम्यान गर्दीचे नियोजन आणि वाहतूक नियंत्रणासाठीही प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे. एआय आधारित प्रगत व्हिडिओ अ‍ॅनालिटिक्सच्या साहाय्याने संशयास्पद हालचाली, वाहतूक नियमभंग, गर्दी आणि आपत्कालीन परिस्थितीवर तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये अत्याधुनिक एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन केले जाणार असून, येथील थेट दृश्ये परिमंडळ पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग आणि पोलिस ठाण्यांना उपलब्ध राहणार आहेत. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती (पीआयसी) स्थापन केली असून, त्यात महापालिका, पीएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमआयडीसी आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

 ठळक मुद्दे

-शहरव्यापी एकात्मिक व केंद्रीकृत सीसीटीव्ही व्यवस्था-एआय-आधारित व्हिडिओ अ‍ॅनालिटिक्सचा वापर -औद्योगिक, आयटी व धार्मिक परिसरांवर विशेष लक्ष-वाहतूक, गर्दी आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम 

एआय-आधारित सीसीटीव्हीचे फायदे

एआय तंत्रज्ञानामुळे संशयास्पद हालचालींची ओळख, वाहतूक नियमभंग शोधणे, गर्दीचा ताण ओळखणे आणि गुन्हे तपासात त्वरित मदत मिळते. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन कारवाई अधिक अचूक होणार आहे.

एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे निगराणी अधिक सक्षमपणे होणार आहे. यातून पोलिसांची कामगिरी आणखी सुधारणार असून, नागरिकांच्या सुरक्षेमध्येही वाढ होणार आहे.  -विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Police to Implement AI-Powered Surveillance System

Web Summary : Pimpri-Chinchwad police will implement an AI-based CCTV system for enhanced crime control, traffic management, and public safety. The system integrates existing and new cameras, focusing on industrial and religious areas, enabling quicker responses to emergencies and suspicious activities. This boosts overall security.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र