शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

नव्वद टक्के गुन्ह्यांची उकल करून १३५ संशयितांच्या आवळल्या मुसक्या

By नारायण बडगुजर | Updated: June 8, 2025 14:07 IST

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर गुन्हेगारांचे कंबरडे मोडले

पिंपरी : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षा यंत्रणांसह पोलिसांसाठीही मोठी डोकेदुखी झाली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी ९० टक्के गुन्ह्यांची उकल करत १३५ संशयित आरोपींना अटक केली आहे. यातून सायबर गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. राज्य पोलिस दलातील ही सर्वाधिक मोठी कारवाई आहे. या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कौतुक होत आहे.

गुंतवणूक, मनी लाँडरिंग, डिजिटल अरेस्टची भीती घालून फसवणूक केली जाते. यात सर्वसामान्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. सायबर चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या तक्रारी सायबर पोलिस ठाणे तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांकडे दाखल केल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. सायबर पोलिस ठाण्यात जानेवारी ते मे कालावधीत २५ गुन्हे दाखल झाले. त्यातील ९० टक्के गुन्ह्यांची उकल करून संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकांकडून कारवाई

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने विविध गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. तसेच गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांकडून प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली. अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्र बाळगणे, अशा कारवायाही केल्या.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस ठाणे आणि सायबर पोलिसांनी समन्वय साधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच तपासातही तप्तरता दाखवली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चांगले काम केल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे कौतुक केले होते.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

सायबर पोलिसांनी आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करून संशयितांना बेड्या ठोकल्या. त्यामुळे चीन, दुबई, पाकिस्तान येथील रॅकेटकडून होणाऱ्या सायबर फसवणुकीचे प्रकार रोखण्यास मदत झाली.

जनजागृतीवर भर

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जनजागृतीवर भर दिला जात आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून सर्वसामान्यांना गंडा घालण्यात येतो. या गुन्ह्यांच्या तपासासाठी सूचना केल्या आहेत. गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच संशयितांना अटक करून कायदेशीर करवाई करण्यात येत आहे. ही कारवाई प्रभावी ठरत असून सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.

- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम