शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मोक्कातील मोस्ट वाँटेड दोन सराईतांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 20:29 IST

गुंडा विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आंबेगाव, सनगर येथील दुर्गम डोंगराळ भागात पायपीट करून आरोपी यादव व पवार यांना पकडले

पिंपरी : मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह एका सदस्याला बेड्या ठोकण्यात आल्या. दोन्ही आरोपी मोस्ट वाँटेड होते. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली. 

गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सुरेश उर्फ बॉबी विलास यादव (वय ३०, रा. पांढरकरचाळ, आकुर्डी, मूळगाव कशेडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) आणि टोळीचा सदस्य कल्पेश संदीप पवार (वय २४, रा. पंचतारानगर, आकुर्डी, मूळगाव कसबा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यादव याच्या गुन्हेगारी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच आकुर्डी येथे आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गून्ह्यात आरोपी यादव व आरोपी पवार हे फरार होते. 

गुंडा विरोधी पथकाने  रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आंबेगाव, सनगर येथील दुर्गम डोंगराळ भागात पायपीट करून आरोपी यादव व पवार यांना पकडले. आरोपी यादव याच्या विरोधात निगडी, चिंचवड व चाकण या पोलीस ठाण्यांमध्ये विविध १३ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी पवार याच्या विरोधात पिंपरी, वाकड व निगडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. 

सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर व श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवार, रामदास मोहिते, शुभम कदम, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस