शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही - डॉ. सदानंद मोरे

By विश्वास मोरे | Updated: March 9, 2025 19:11 IST

उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती 

 पिंपरी:  पुढील १०० वर्षात मराठे जगात पहिल्या क्रमांकावर जातील, असे इतिहास संशोधक जदुनाथ सरकार यांनी सांगितले होते. मात्र तसे झाले नाही. कारण जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आलेले नाही. आजवर इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळाले. जातींचे ऐक्य नष्ट झाले कि राज्य संपले. उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती आज आहे. जोपर्यंत आपण आयडियॉलॉजीला आपली आयडेंटिटी करत नाही, तोपर्यंत आपण जगात अग्रेसर होऊ शकत नाही. सर्वांना एकत्रित घेणारा महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी असली पाहिजे, असे मत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. 

पिंपरी मनसेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक  प्रा. सदानंद मोरे यांचा सन्मान केला. त्यानंतर  'महाराष्ट्र काल आज आणि उद्या'  यावर प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्याख्यान दिले. 

रामाचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्येडॉ सदानंद मोरे म्हणाले, 'मी आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच भूतकाळ आणि भविष्य आणि वर्तमान काय याबाबत बोलणार आहे. महाराष्ट्राशी माझा संबंध लहानपणापासून आला. तेव्हापासून माझा अभ्यास सुरू आहे. आचार्य अत्रे, अनेक संघटना, माझा वावर त्यात होता. पण मी राजकारणापासून अलिप्त राहिलो.  मी ऐकले नाशिक शहर हे राज ठाकरे यांचे आवडत ठिकाण आहे. रामायणाचा संबंध नाशिकशी आहे. भरत आणि श्रीराम यांची भेट तिथं झाली. भरताने रामाचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्ये केला ही बाब नाशिकच्या लोकांना माहिती नाही. त्यानंतर अयोध्येला राज्याभिषेक झाला. ब्रिटिश अधिकारी हंटर यांनी दिल्ली ऐवजी भारताची राजधानी नाशिक असायला हवी होती.' महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी डॉ मोरे म्हणाले, ब्रिटिश काळात महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन होऊ लागले. जदुनाथ सरकारने औरंगजेबावर पुस्तक लिहिले.  त्यात वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव येत होते. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले सगळे सगळे. त्यात मराठा, दलीत असे सगळे त्यात आले. इतिहासात महाराष्ट्राचा दृष्टिकोन व्यापक राहिलेला आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, अशी आपण यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढतो. असे अनेक प्रसंग आहेत.'

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRaj Thackerayराज ठाकरेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड