शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांना आला ‘भाव’, एक लिंबू ८ ते १० रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:31 IST

बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी आहे.

पिंपरी : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचे दर कडाडले आहेत. बाजारात लिंबांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार ८ ते १० रुपयांना एक नग मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत.

बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी आहे. या महिनाभरापासून लिंबांना अधिक मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असे पिंपरी बाजारपेठेतील व्यापारी आबासाहेब रायकर यांनी सांगितले.पिंपरी बाजारात गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी ३०० ते ४०० गोणी लिंबांची आवक होत होती. मात्र, सध्या ही आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात सध्या १५० ते २०० गोण्यांची आवक होत आहे. त्यातच आता उन्हाच्या वाढत्या झळांमुळे लिंबांना मागणी वाढली आहे. एका गोणीत आकारमानानुसार ३५० ते ४५० लिंबू असतात. सध्या घरगुती वापराबरोबरच हॉटेल्स, रसवंतिगृह आणि ज्यूस सेंटरकडून लिंबांना मोठी मागणी असते.

येथून लिंबांची होते आवकपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लिंबू बाजारात येत असून, अहमदनगर जिल्ह्यातील राशीन, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथूनही लिंबू येत आहेत. 

उन्हाळ्यामुळे लिंबांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, गेल्या महिनाभरापासून लिंबांची आवक कमी होत आहे. लिंबांना बाराही महिने मागणी असते. मात्र, उन्हाळ्यात ती खूप मोठ्या प्रमाणात असते. जून महिन्यापर्यंत लिंबांचे दर तेजीतच राहणार आहेत. पाण्याअभावी लिंबाचे उत्पन्न कमी निघत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लिंबांच्या उत्पन्नावर होत आहे. - आबासाहेब रायकर, व्यापारी, पिंपरी बाजारपेठ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMarket Yardमार्केट यार्ड