शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावांचा कचरा शहरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:07 IST

कचरा संकलन करताना करावा लागतोय अडचणींचा सामना..

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाकडे पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरताओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू

पिंपरी : शहराचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कचºयाचे संकलन करताना महापालिका प्रशासन जेरीस आले आहे. असे असतानाच महापालिका हद्दीबाहेरील कचरा शहरात आणून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेला कचºयाचे संकलन करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. चिखली येथील जाधववाडीमधील सीएनजी पंपाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कचºयातील अनेक कागदांवर हिंजवडी येथील पत्ता आहे. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेरील गावांतील कचरा शहरात आणून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, कचरा नेमका कोण आणि कधी टाकते, ही माहिती मिळविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. महापालिका प्रशासनाकडे पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे शहरातील सर्व भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पर्यायाने शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कचरा संकलन एजी इन्व्हारो व बीव्हीजी या दोन कंपन्यामार्फत केले जात आहे.शिवाय ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. .........हिंजवडीतील कचरा असल्याची शंका १पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावे व तेथील सोसायट्यांमधील कचरा शहरात आणून टाकला जात आहे. त्यामुळे कचºयाची समस्या अजूनच जटिल होत आहे. शहरालगतच्या गावांमधून कचरा शहरातील मोकळ्या मैदानांमध्ये वाहनांमधून आणून टाकला जातो. चिखली येथे टाकण्यात आलेल्या कचºयामधील अनेक वस्तूंच्या कव्हरवर हिंजवडी येथील पत्ता आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २दररोज सुमारे एक हजार टन कचरा निर्माण होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाºया कचºयाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे. मात्र, अशाप्रकारे महापालिका हद्दीबाहेरील कचरा शहरात टाकला जात असल्याने समस्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGarbage Disposal Issueकचरा प्रश्न