शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या पाणीपट्टीत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 14:17 IST

निवडणूक संपली आता करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर

ठळक मुद्देसत्ताधारी भाजपा करवाढीवर कोणता निर्णय घेणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता महापालिकेने २० एप्रिल २०१८ मध्ये पाणीपट्टी दरामध्ये केली सुधारणा

पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता महापालिकेने पाणीपट्टी करवाढीचा प्रस्ताव तयार केला असून, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा करवाढीवर कोणता निर्णय घेणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने गेल्यावर्षी मिळकत, पाणीपट्टी करात वाढ प्रस्तावित केली होती. मात्र, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असल्याने कोणतीही करवाढ झालेली नव्हती. निवडणुका संपल्याने अर्थसंकल्पापूर्वी महापालिकेने पुन्हा करवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. .......समन्यायी पाणीवाटप फोलमहापालिकेने २० एप्रिल २०१८ मध्ये पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार पाणीपट्टी वसूल करण्यात येते. आवश्यक मानकापेक्षा जास्त पाणी वापर करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे विचार करूनच पाणीपट्टीचे सुधारित दर प्रस्तावित केले आहेत. तसेच दरवर्षी सर्व प्रकारच्या दरांमध्ये वार्षिक पाच टक्के वाढ प्रस्तावित करण्याचे सुचविले आहे. शहरात पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक नळ जोडावरील पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही, असे नमूद करून पाणीवापर जास्त करणाऱ्या ग्राहकांवर वचक ठेवण्यासाठी जास्त दर असावेत, अशी शिफारस प्रशासनाने प्रस्तावात केली आहे. .......असा आहे दरवाढीचा प्रस्ताव पाणीपट्टी दरांमध्ये वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत दरमहा सहा हजार लिटरपर्यंतचे पाणी मोफत दिले जाणार असून, त्यापुढील पाणीवापराच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ सुचविण्यात आली आहे. निवासी वापरासाठीच्या प्रतिकुटुंब, प्रतिसदनिका दरमहा सहा ते १५ हजार लिटरसाठी आठ रुपये, १५ ते २० हजार लिटरपर्यंत ४० रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. तसेच २० हजार लिटरपुढील वापरासाठी शंभर रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित आहे. व्यापारी कारणासाठी पाणीवापरासाठीचा दर ५५ रुपये निश्चित केला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतरच अंमलबजावणी केली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीElectionनिवडणूक