शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 20:01 IST

प्राथमिकदृष्ट्या या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्याने न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र सुनावणी घेऊन सर्व बाबींची तपासणी करण्याचे आदेश दिले.

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत झालेल्या एका गंभीर प्रशासकीय चुकीचा फटका थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बसला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)च्या उमेदवाराचा एबी फॉर्म गहाळ झाल्याच्या प्रकरणात ब प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांच्याकडून कामकाज काढले आहे.

राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जयश्री भोंडवे यांनी प्रभाग १६ मधून ओबीसी महिला आरक्षणांतर्गत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत त्यांनी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ही जोडला होता. मात्र छाननी प्रक्रियेदरम्यान हा एबी फॉर्म गहाळ झाल्याचे कारण पुढे करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयश्री भोंडवे यांना अपक्ष उमेदवार ठरवले. या निर्णयाविरोधात जयश्री भोंडवे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म सादर केल्याचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी तसेच अन्य तांत्रिक पुरावे सादर केले. प्राथमिकदृष्ट्या या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्याने न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र सुनावणी घेऊन सर्व बाबींची तपासणी करण्याचे आदेश दिले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाई

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. ब प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांच्याकडील कामकाज काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एबी फॉर्म गहाळ होण्याच्या प्रकारामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीची सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म वेळेत सादर केला होता, हे स्पष्ट झाले. सादर करण्यात आलेले पुरावे आणि तांत्रिक नोंदी तपासल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी हा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवे यांना प्रत्यक्ष चिन्ह वाटपाच्या यादीत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह देण्यात आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कामकाज काढून घेण्यात आले आहे  - श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Election Commission's Mishap: Officer Penalized for Missing Candidate's Form

Web Summary : Election officer penalized after a Nationalist Congress Party candidate's 'AB Form' went missing during Pimpri election process. Court intervention led to reinstatement of party symbol. Official removed from duty.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग