शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी- चिंचवड महापालिकेची कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या ९ वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 21:11 IST

पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने ९ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज धनादेश प्रदान..

पिंपरी : महापालिका सेवेतील कोरोनामुळे मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांच्या दु:खात महानगरपालिका सहभागी आहे, असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयाचे धनादेशाचे वाटप आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण विभागाच्या माया वाकडे आदी उपस्थित होत्या.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, ‘‘अचानक उद्भवलेल्या कोरोना विषाणु संसगार्मुळे देशात लाखो जणांचा मृत्यू झाला. महानगरपालिकेतील काही कर्मचारी बंधु भगिनींचा देखील कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी यांचे समवेत चर्चा करुन मयत महापालिका कर्मचा-यांच्या वारसास २५ लाख इतकी मदतीची रक्कम देण्याचा निर्णय झाला असे सांगुन महापौर माई ढोरे यांनी वारसांना मार्गदर्शन करताना, सदर रकमेचा मुलांचे शिक्षण व भविष्य घडविण्यासाठी रकमेचा वापर करावा असे सांगितले...............................या वारसांना मिळाली मदत

महानगरपालिकेच्या वतीने ९ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज धनादेश प्रदान केले. यामध्ये अकबर सय्यद, वाहन चालक नागरवस्ती विकास योजना, रमेश जगताप, मुकादम ह क्षेत्रीय आरोग्य, राजेंद्र तुपे, सहाय्यक शिक्षक - माध्यमिक, काळुराम नलावडे, शिपाई झ्र बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम, विनायक फापाळे, मुख्य लिपिक ड क्षेत्रीय कार्यालय, अलका साळवे, स्टाफनर्स वायसीएम रुग्णालय, मोहन डिगोळे, लिपिक नागरवस्ती विकास योजना, रामदास राखपसरे, सफाई कामगार ब क्षेत्रीय आरोग्य आणि पंडीत कुटे, प्लंबर क क्षेत्रीय आरोग्य यांच्या वारसांना महानगरपालिकेने धनादेश सुपुर्द केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूEmployeeकर्मचारीMayorमहापौर