शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे युवतींना मिळणार रोजगाराच्या संधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 2:53 PM

१८ ते ३० वयोगटातील युवक, युवतींना मोफत प्रशिक्षण

ठळक मुद्देमोफत प्रशिक्षण : महिला बालकल्याण समितीची मंजुरी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ‘लाईट हाऊस’ प्रकल्प राबविण्याचा विषय मंजूर

पिंपरी : महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची सभा आज झाली. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ‘लाईट हाऊस’ प्रकल्प राबविण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत १८ ते ३० वयोगटातील युवक, युवतींना मोफत प्रशिक्षण देवून, रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यात येणार आहेत.पुणे महानगरपालिकेत पुणे सिटी कनेक्ट डेव्हल्पमेंट फाऊंडेशनच्या वतीने ‘लाईट हाऊस’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेने तयारी दर्शविली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत चर्चा झाली होती. त्यानंतर महापालिकेने शहरातील जागांची पाहणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्यात जुने ड क्षेत्रीय कार्यालय, पिंपरीगाव आणि झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाचे वरील पहिला मजल्यावरील हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संदर्भातील विषय आजच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेसमोर आला होता. अध्यक्षस्थानी निर्मला कुटे होत्या. लाईट हाऊस प्रकल्पाच्या विषयास मंजूरी देण्यात आली. या अंतर्गत महापालिका क्षेत्रातील वय वर्षे १८ ते ३० या वयोगटातील महिला, मुले, मुली, शालाबाह्य विद्यार्थी यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. प्रकल्पाचा खर्च सीएसआरच्या निधीमधून केला जाणार आहे. तसेच यासाठी स्वतंत्रपणे कर्मचारी वर्ग नियुक्त केला जाणार असून याबाबतची सर्व जबाबदारी ही संस्थेची असणार आहे. या उपक्रमाकरीता लोकसहभाग मिळवून देण्यासाठी तसेच लाभार्थी मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील समुहसंघटक उपलब्ध करून दिले जाणार आहेत..........४प्रशिक्षण दिलेल्या लाभार्थींपैकी पन्नास टक्के लाभार्थींना सहा महिन्यांत रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची असणार आहे. हे काम करण्यासाठी, प्रकल्प राबविण्यासाठी महापालिका आणि  पुणे सिटी कनेक्ट डेव्हल्पमेंट फाऊंडेशन समवेत करार केला जाणार असून त्याविषयास महिला बालकल्याण समितीने मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रायोगिक तत्वावरील हा प्रकल्प एका भागात यशस्वी झाल्यास शहरातील अन्य भागात केला जाणार आहे, याबाबतही समितीने मंजूरी दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिला