शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात अव्वल

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 4, 2025 19:43 IST

आरोग्य व्यवस्थापन, मातृ व बाल संगोपन आणि लसीकरणात आघाडी; ९२ गुणांसह ठरली राज्यातील सर्वोत्कृष्ट महापालिका

- ज्ञानेश्वर भंडारे  पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली अहवालानुसार राज्यातील महापालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालात १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंतच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे.सार्वजनिक आरोग्याच्या विविध निकषांवर, विशेषतः कुटुंब कल्याण, मातृ व बाल संगोपन, तसेच नियमित लसीकरण कार्यक्रम यामध्ये पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने प्रसारित केलेल्या जानेवारी २०२५ च्या अहवालानुसार, पिंपरी- चिंचवड महापालिकेने ९२ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे.सार्वजनिक आरोग्य सेवांमधील उत्तुंग कामगिरीमहापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी अनेक प्रभावी उपक्रम राबवले आहेत. यामध्ये मातृ व बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गरोदर माता नोंदणी, १२ आठवड्यांपूर्वी प्रसूतीपूर्व नोंदणी, गरोदर मातांचे लसीकरण आणि आयएफए गोळ्यांचे वितरण यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच बाल आरोग्य सेवांच्या अंतर्गत नवजात बालकांची नोंदणी प्रभावीपणे झाली आहे. नियमित लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचे नियोजन, तसेच पीपीआययूसीडी बसवण्याचे प्रमाण वाढवण्यावर भर, गरोदर महिलांसाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्यावर भर देणे, या सारख्या विविध उपक्रमांचाही यामध्ये समावेश आहे.राज्यातील आघाडीच्या महापालिकापिंपरी-चिंचवड – ९२ गुण (प्रथम क्रमांक)कोल्हापूर - ८८ गुण (द्वितीय क्रमांक)सोलापूर - ८८ गुण (तृतीय क्रमांक )नवी मुंबई - ८८ गुण ( चतुर्थ क्रमांक)सांगली - ८७ गुण (पाचवा क्रमांक)पुणे - ८७ गुण ( सहावा क्रमांक) 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनास राज्यपातळीवर प्रथम क्रमांक मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाले आहे. भविष्यात अधिक व्यापक आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवण्यावर, उपाययोजना करण्यावर भर देत आहोत.- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे