शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीत सत्ताधारी- विरोधकांची अळीमिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 21:33 IST

तीन आठवड्यापूर्वी महापालिका मुख्यालयात एसीबीने धाड टाकली होती. स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना अटक केली होती. त्यावरून विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने भाजपवर टीका केली होती.

पिंपरी :  ‘‘स्थायी समिती बरखास्त करा, आमचे सदस्य सभेत सहभागी होणार नाहीत, असे विधान करणारे विरोधीपक्षातील सदस्य स्थायी समिती सभेत सहभागी झाले होते. त्यातुन भाजप,राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य असणाऱ्या स्थायी समितीत अळीमिळी दिसून आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची सभा ऑनलाइन झाली. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. नितीन लांडगे होते. विषयपत्रिकेवरील सर्वच म्हणजेच २९ विषयांना मान्यता दिली. याशिवाय आयत्यावेळच्या सहा अशा तब्बल ४३ कोटी ९८ लाख ५२ हजार २०२ रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.तीन आठवड्यापूर्वी महापालिका मुख्यालयात एसीबीने धाड टाकली होती. स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना अटक केली होती. त्यावरून विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने भाजपवर टीका केली होती.............विषयपत्रांचा अभ्यास नाही स्थायी समिती बरखास्त करा, अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर दोन बैठका राष्ट्रवादीचे चार सदस्य उपस्थित नव्हते.  मात्र, आजपासून विरोधक स्थायी समिती बैठकीत सहभागी होऊ लागले आहेत. एकाही विषयाला विरोध दर्शविला नाही. त्यावर आम्हाला सभेत सहभागी होण्याचा दुपारी उशिरा निरोप मिळाला. आम्हाला विषयपत्र वाचता आले नाही. त्यामुळे विषयाला विरोध करता आला नसल्याचे अजब स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या स्थायीतील सदस्यांनी दिले. त्याचबरोबर शिवसेनेच्या सदस्यानेही सभेत सहभाग घेतला...........आजच्या सभेत सर्वपक्षीय सदस्य सहभागी झाले होते. पाणी आरोग्य, वैद्यकीय आदी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. मते मांडली. पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. सणासुदीच्या काळात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली. डेग्यूबाबत उपाययोजना कराव्यात. दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांना दिले आहेत.-नितीन लांडगे, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका.....................महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी नैतिकता दाखविली नाही. शहराच्या विकासासाठी प्रश्न मांडण्यासाठी, तसेच चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी सभागृहात उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे चुकीच्या कामांना विरोध असेल. आजही सल्लागार नियुक्तीला विरोध केला.    -राजू मिसाळ, विरोधीपक्षनेते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण