शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मैलाशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या वापरासाठी 'मास्टर प्लॅन'  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:46 IST

सध्या पिंपरीत १४ मैलाशुद्धीकरण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते.

ठळक मुद्देमैलाशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या सुमारे २७० ते २७५ दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रिया

पिंपरी :  महापालिका क्षेत्रातील १४ मैलाशुद्धीकरण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रिया केेलेल्या पाण्यापैकी २३ दशलक्ष लिटर पाण्याचा फेरवापर केला जातो. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याव्यतिरिक्तचा वापर करण्याच्या दृष्टीने 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे.    

       पिंपरी - चिंचवड महापालिकेची सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आहेत. महापालिका हद्दीतील सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रीया करण्यासाठी सद्यस्थितीत एकूण नऊ ठिकाणी ३५३ दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेचे १४ मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. त्यामध्ये रावेत (२०), आकुर्डी (३०), चिंचवड (टप्पा १ - ३०, टप्पा २ - ३०), चिखली (टप्पा १ - १६, टप्पा २ - १६), कासारवाडी (टप्पा १ - ४०, टप्पा २ - ४०, टप्पा ३ - ४०), दापोडी (२०), सांगवी (१०), पिंपळे - निलख (२०), चरहोली (टप्पा १ - २०, टप्पा २ - २१) अशा एवूâण ३५३ दशलक्ष लिटर क्षमतेच्या १४ मैलाशुद्धीकरण केंद्राचा समावेश आहे. १५६६ किलोमीटर मलनि:सारण नलिका टाकण्यात आल्या आहेत.

  मैलाशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या सुमारे २७० ते २७५ दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे. या मैलाशुद्धीकरण केंद्रातील स्काडा प्रणालीद्वारे देखरेख ठेवली जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत ही स्काडा प्रणाली कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहेमैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर केला जातो. कासारवाडी टप्पा एकच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले पाच एमएलडी पाणी मिलीटरी डेअरी फार्ममध्ये शेतीसाठी वापरले जाते. तर, टप्पा तीनच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले दहा एमएलडी पाणी सीएमई येथील रोर्इंग चॅनलसाठी वापरले जाते. चिखली टप्पा एक आणि दोनमधील मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले तीन एमएलडी पाणी संभाजीनगर, शाहूनगर भागातील महापालिकेची उद्याने, गृहरचना सोसायटींसाठी वापरण्यात येते. वायसीएम रूग्णालयातील ०.६५ एमएलडी पाणी रूग्णवाहिका धुणे आणि गार्डनिंगसाठी वापरले जाते. तसेच कासारवाडी, िंचचवड आणि आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले पाच एमएलडी पाणी महापालिकेच्या ठिकठिकाणच्या उद्यानासाठी टँकरद्वारे वापरण्यात येते. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याव्यतिरिक्तचा वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरWaterपाणी