शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 31, 2024 19:20 IST

महापालिकेने महावितरणला पाठविले पैसे

पिंपरी : महापालिकेच्या वतीने खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या योजनेसाठी काम सुरू आहे. त्यासाठी तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामास अडथळा ठरत असलेल्या विविध ठिकाणच्या उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहिन्या स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक ते शुल्क महावितरण कंपनीकडे जमा करण्यात आले आहे.

भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. शहरासाठी पाणी आणण्यासाठी धरणाच्या वाकीतर्फे वाडा येथे अशुद्ध पाणी उपसा केंद्रासाठी जॅकवेल आणि पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची भूमिगत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी चाकण वांद्रा रस्ता व कारंजा विहीर येथे महावितरणच्या उच्च व लघुदाब वीज वाहिन्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. त्या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी ३९ हजार ६२३ रुपये पर्यवेक्षण शुल्क महावितरणला देण्यात येणार आहे.ब्रेक प्रेशर टाकीपासून तळवडे - देहूपर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामासाठी इंदोरी गाव ते जांबवडे गाव ते जाधववाडी धरण रस्तामार्गे नवलाख उंब्रे या ठिकाणी उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. त्या वाहिन्या हटविण्यासाठी २ लाख ३० हजार ६९१ रुपये पर्यवेक्षण शुल्क महावितरणला देण्यात येणार आहे. हे सर्व शुल्क महावितरणाला अदा करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी, स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर ते शुल्क महावितरणकडे भरण्यात आले आहे.

 जल उपसा केंद्रासाठी ३ हजार केव्हीए वीज...

भामा-आसखेड धरणाजवळील अशुद्ध जलउपसा केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रास ३ हजार केव्हीएचा वीजभार आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणला सुरक्षा ठेव, करारनामा शुल्क, सेवा शुल्क, पर्यवेक्षण शुल्क असे एकूण ३ कोटी २२ लाख ७२ हजार ३४५ रुपये शुल्क महावितरण कंपनीने मागितले आहे. त्यापैकी ३ कोटी १० लाख ९१ हजार ३०० रुपये महावितरण कंपनीस बँक गॅरंटी स्वरूपात यापूर्वी देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख ८१ हजार ४५ रुपये देण्यात येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाelectricityवीजWaterपाणीGovernmentसरकार