शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election Results 2026 : आज ठरणार पालिकेचे कारभारी..! दुपारी उधळला जाणार गुलाल;आठ ठिकाणी मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 08:56 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरातील आठ ठिकाणी मतमोजणी : दुपारी दोनपर्यंत होणार चित्र स्पष्ट; उत्सुकता शिगेला

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील आठ ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेस आज, शुक्रवारी (दि. १६) सकाळी दहापासून सुरुवात होणार आहे. मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असतील. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीचा निकाल ध्वनिक्षेपकावर जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण मतमोजणी दुपारी दोनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ठरवलेल्या ठिकाणी मतमोजणी होईल. प्रत्येक ठिकाणी चार प्रभागांची अशी एकूण ३२ प्रभागांची मोजणी करण्यात येईल. मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा तपशील निश्चित करण्यात आला आहे. पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहायक कर्मचाऱ्यांना पूर्वप्रशिक्षण देण्यात आले आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, ओळखपत्र तपासणी व माहिती कक्ष उभारण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच, प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. निकाल जाहीर करताना संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

मतमोजणीच्या १० ते २१ फेऱ्या होणार

एका प्रभागात किमान ३९ ते कमाल ९७ मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार मतमोजणीसाठी ३ ते ७ टेबलची व्यवस्था केली आहे. त्यानुसार किमान १० ते कमाल २१ इतक्या फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. टपाली मतदारासाठी स्वतंत्र टेबल ठेवले आहेत.

या ठिकाणी होणार मतमोजणी

क्षेत्रीय कार्यालय - प्रभाग क्रमांक- मतमोजणी ठिकाण

अ - १०, १४, १५, १९ - डॉ. हेडगेवार भवन, निगडी, प्राधिकरण

ब - १६, १७, १८, २२ - ऑटो क्लस्टर, चिंचवड

क - २, ६, ८, ९ - संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर

ड - २५, २६, २८, २९ - ड क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी

ई - ३, ४, ५, ७ - कबड्डी प्रशिक्षण संकुल, भोसरी

फ - १,११, १२, १३ - घरकुल येथील चिखली टाऊन हॉल

ग - २१, २३, २४, २७ - शंकर गावडे कामगार भवन, थेरगाव

ह - २०, ३०, ३१, ३२ - कासारवाडी, भाजी मंडई

टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2026Ajit Pawarअजित पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग