शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका 'ॲलर्ट'; ६५० रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:10 IST

कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट रक्कम घेतल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, महापालिकेचा रुग्णालयांना इशारा

पिंपरी चिंचवड : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे  या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर रुग्णालयाला समज देणार असल्याचे महिला आयोगाने सांगितले होते. तसेच रुग्णालय दोषी असून कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. 

या सर्व प्रकाणानंतर गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ घैसास यांनी राजीनामा दिला आहे. परंतु राज्य सरकारच्या अहवालानुसार त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. या सर्व प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका सजग झाली असून ६५० रुग्णालयांना अनामत रक्कम न घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत. तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी महापालिकेने तब्बल 650 रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहेत. कोणत्याच रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल.असा इशारा पालिकेने या नोटीसीद्वारे रुग्णालयांना दिला आहे.

डॉ सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने त्याची कबुलीही दिली होती. त्याच्यानंतर गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत असे त्यांनी नमूद करत राजीनामा दिला. हॉस्पिटलच्या डिपॉझिट मागण्यावरूनच महिलेला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने अनामत रक्कम न घेण्याविषयी सूचना रुग्णालयांना दिल्या आहेत.   

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMONEYपैसाWomenमहिला