शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला पाच वर्षांची शिक्षा; अमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती कारवाई

By नारायण बडगुजर | Updated: March 9, 2025 13:05 IST

न्यायलयाने नंदा बोत्रे हिला ५ वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे

पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल केला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. या महिलेला खेड न्यायालयाने ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

नंदा विलास बोत्रे (५४, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे), असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे २) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड यांचे पथक तयार केले. पथक म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते.संशयित महिला नंदा बोत्रे हिच्याकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने कारवाई करून नंदा बोत्रे या महिलेकडून एक लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये ३ किलो ८१० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयित महिलेच्या विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२४ एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष जायभाये यांनी केला होता. 

याप्रकरणाची सुनावणी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. घानीवाल यांच्याकडे चालू होती. अंमली पदार्थ विरोधी पथकातर्फे सुनावणी करीता पाठपुरावा करण्यात येत होता. यात ५ मार्च रोजी न्यायलयाने नंदा बोत्रे हिला ५ वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक संतोष जायभाये, राजन महाडीक, पोलिस अंमलदार प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, सूर्यकांत पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसArrestअटक