Pimpri Chinchwad Corona Update : दिलासादायक! एका दिवसात १५ हजार नागरिकांना लस; मृतांचा आलेखही कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 20:58 IST2021-06-25T20:58:32+5:302021-06-25T20:58:39+5:30
पिंपरीत शुक्रवारी दिवसभरात २३६ नवे कोरोना रुग्ण, तर १४० कोरोनामुक्त

Pimpri Chinchwad Corona Update : दिलासादायक! एका दिवसात १५ हजार नागरिकांना लस; मृतांचा आलेखही कमी
पिंपरी: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या कमी होत आहे. आज कोरोना मुक्तांची संख्या कमी झाली आहे. दाखल रुग्णांची संख्या आठशच्या आत आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला अशाून या महिन्यात प्रथमच एका दिवसात पंधरा हजार लसीकरण झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. शहर परिसरातील खासगी आणि शासकीय अशा विविध रुग्णालयांमध्ये ४ हजार ८७५ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी २३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ८६७ वर पोहोचली आहे.
...................
कोरोनामुक्तांचे प्रमाण झाले कमी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी झाले आहे. आज १४० जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ५०हजार ९४४ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ५६ हजार ४५५ वर पोहोचली आहे.
......................
तीन जणांचा मृत्यू
मृतांचा आलेख कमी झाला आहे. कालपेक्षा दोनने आलेख कमी झाला आहे. आज शहरातील ३ आणि शहराबाहेरील २ अशा एकूण ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर कोरोनाने मृत होणाºयांची संख्या ४ हजार २७३ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरूणांचा समावेश अधिक आहे.
...........................
लसीकरणाचा विक्रम
लसीकरणाचा वेग वाढू लागला आहे. शुक्रवारी विविध ६५ केंद्रावर १५ हजार ६६५ जणांना लस देण्यात आली. एकूण लसीकरण ५ लाख ९५ हजार ५१० वर पोहोचले आहे.