शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
7
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
8
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
9
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
10
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
11
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
12
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
13
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
14
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
15
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
16
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
17
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
18
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
19
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
20
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

पिंपरी चिंचवड जळीतकांड..! दिवाळीत पगार कापल्याने चालकानेच टेम्पो ट्रॅव्हलरला लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 19:41 IST

या घटनेच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- किरण शिंदेहिंजवडी : हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो ट्रॅव्हलर) अचानक आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. पुढील बाजूस बसलेले कर्मचारी आणि चालक पेटत्या बसमधून बाहेर पडले, मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्याने अडकून पडलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फेज एकमधील विप्रो सर्कलजवळ बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना  घडली होती. या घटनेच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नसून घात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला असल्याची माहिती समोर येत आहे. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता. चालकाचा दिवाळीत पगार कापला होता. तर गाडीतील सह कर्मचारी यांनी त्रास दिला होता म्हणून त्याने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्यामुळं चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी अन पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालक जनार्दन हंबर्डीकर गुन्हा दाखल करण्यात आलाय.   

 बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी माहिती दिली. त्यात घातपात असल्याचे उघड झाले आहे. विशाल गायकवाड म्हणाले, 'अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आग कशामुळे लागली. याचा तपास सुरु केला. त्यावेळी शॉर्ट सर्किटने आग लागली नसल्याचे आढळून आहे. मग कामगारांशी आणि कंपनीत चौकशी केली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये बोनस न दिल्याने आणि वेतन कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली आहे, अशी माहिती उघड झाली आहे. नियोजनबद्द कट रचून त्याने हा प्रकार केला आहे. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच वारजे येथून काडेपेटी घेतली होती. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या, उडी मारली. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला.  कशामुळे घडले ? १) हंबर्डीकर यांचे कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांशी सतत वाद होत होते. दररोजच्या प्रवासातील समस्या आणि सहकारी कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संघर्षांमुळे तणाव वाढत असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या तपासात आढळले. २) हंबर्डीकर याने काडी पेटवून रासायनिक स्फोट घडवून गाडीला आग लावली. स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती.  यांचा गेला नाहक बळी वाहन पेटवून झालेल्या अपघात सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (५८, रा. नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड), राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी) यांचा मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (५२, रा. कोथरूड), विश्वास लक्ष्मण खानविलकर (पुणे), प्रवीण निकम (३८), चंद्रकांत मलजी (५२, रा. दोघेही कात्रज) जखमी झाले. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप बाबुराव राऊत बसमधून सुखरूप बाहेर पडले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसArrestअटकMaharashtraमहाराष्ट्र