पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीसह पिंपरीतील एका मोबाईलच्या दुकानाला मंगळवारी आग लागली. एकाच दिवसांत घडलेल्या या आगीच्या दोन घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर येथे सेंच्युरी एका कंपनी आहे. या कंपनीतील एका प्लँटला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यामध्ये महापालिकेच्या संत तुकाराम अग्निशामक केंद्राच्या चार तसेच भोसरी, तळवडे, प्राधिकरण येथील गाड्यांसह चाकण एमआयडीसी, टाटा मोटर्स, बजाज, आणि सेंचुरी एन्का कंपनीच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. येथे मोठ्याप्रमाणात धूर असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना काहीसा त्रास झाला. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:50 IST