उद्योगनगरीत ९९ इमारती, वाडे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:44 IST2017-07-27T06:44:44+5:302017-07-27T06:44:48+5:30
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

उद्योगनगरीत ९९ इमारती, वाडे धोकादायक
पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात शहरातील जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे माहापलिका प्रशासनाच्या स्थापत्य विभागाच्या वतीने अशा इमारतींना नोटिसा बजावण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यंदा ९० घर मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. तसेच, जी घरे जीर्ण झालेली आहेत, ती लवरात लवकर संबंधित मालकांनी दुरुस्त करून घेण्याचे बजावण्यात आले आहे. गेल्या वर्षी अशा धोकादायक इमारतींची संख्या १२१ इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत अशा इमारतीच्या संख्येत घट झाली आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य विभागाने पाहणी करून त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. पावसाळ्यात जुन्या इमारतींचा धोका निर्माण होऊन वित्तीय व जीवित हानी होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना घर मालकांना करण्यात आलेल्या आहेत.
तसेच, धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना, आसपासच्या परिसरातील रहिवाशांना व या भागातून ये-जा करणाºयांना नागरिकांना कोणतीही इजा पोहोचू नये, यांची दक्षता घ्यावी लागणार आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर स्थापत्य विभाग धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करीत असते.
यंदाच्या वर्षी केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील ९९ इमारती धोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. त्या सर्व धोकादायक इमारतींच्या घर मालकांना स्थापत्य विभागाने नोटीस दिल्या आहेत. धोकादायक इमारतींची त्वरित दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी संबंधित घर मालकांची आहे.
तसेच, जर घर मालक इमारत दुरुस्त करणार नसतील, तर भाडेकरूही महापालिकेची परवानगी घेऊन ते धोकादायक इमारतींची दुरुस्ती करून घेता येईल. याबाबत धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीस तातडीने परवानगी देण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीतील नागरिकांना धोकादायक इमारत आढळल्यास त्यांनी महापालिका स्थापत्य विभागास लेखी स्वरूपात कळवावे. कोणत्याही इमारतींचा अर्धवट भाग कोसळल्यास नागरिकांनी त्वरित आपत्कालीन विभागास तातडीने कळवावे, असे आवाहन स्थापत्य विभागाने केले आहे.
असे असते नोटिसीचे स्वरूप
इमारत धोकादायक स्थितीत
असल्याचे निदर्शनास
स्थापत्य विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर इमारतीचा संबंधित भाग दुरुस्त करावा
शक्य नसल्यास
महापालिकेला कळवावे.
दुरुस्तीचा खर्च पालिकेला दिल्यास पालिका दुरुस्त
करून घेईल.
‘‘नागरिकांनी नोटिसांचा गंबीरपणे विचार करावा व इमारतींची दुरुस्ती करावी. संबंधित मालकांना शक्य नसल्यास त्यांनी स्थापत्य विभागास कळवावे. आवश्यक शुल्क जमा करून महापालिकेकडून दुरुस्ती करून दिली जाईल. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.
- अंबादास चव्हाण, शहर अभियंता, स्थापत्य विभाग