शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी राहणार वॉच, जिल्हास्तरीय समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:27 IST

- दुधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

नीरा : जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये अपर पोलिस अधीक्षक, पुणे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पुणे, उप नियत्रंक वैध मापन शास्त्र पुणे हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील. दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्ती, डेअरी याची माहिती समितीकडे देण्यात यावी, असे आवाहन समितीने केले आहे.दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वांचा स्रोत असून चांगले आरोग्य राखण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तथापि हानिकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या हिताला मोठा धोका निर्माण होतो. दूध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टिक मूल्याशी तडजोड करीत नाहीत. तर, मानवी शारीरिक समस्या, पचन, ॲलर्जी आणि दीर्घकालीन अवयवांचे नुकसान यासारख्या गंभीर आरोग्य समस्यादेखील होऊ शकतात.

या समस्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील दूध संकलन स्वीकृती केंद्र, पुणे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नमुने तसेच सहकारी व खासगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणीसाठी सहायक आयुक्त (अन्न), अन्न औषध प्रशासन विभाग, पुणे विभागाकडील अन्न सुरक्षा यांना दरमहा उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती, डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून भेसळ केल्याचे आढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल. दूध भेसळीबाबत माहिती देण्यासाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक व EMAIL ID.:- FDAPUNE2019@GMAIL.COM वर तक्रार नोंदवावी. दूध भेसळीबाबत तक्रार, माहिती देण्याऱ्या व्यक्तींची माहिती पुर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmilkदूधPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र