शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

देहूत रंगला सोहळा..! हरिनाम गजरात तुकोबा निघाले जर्मनीला

By विश्वास मोरे | Updated: February 13, 2026 20:03 IST

- विठ्ठलधाममध्ये अक्षय्यतृतीयेस मूर्तीची प्रतिष्ठापना

पिंपरी : टाळ मृदुंग आणि हरिनाम गजरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची मूर्ती जर्मनीच्या विठ्ठलधाममध्ये प्रतिष्ठापना होण्यासाठी मार्गस्त झाली. देहू येथे शुक्रवारी (दि. १३) जर्मनीतील भाविकांकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली.

जर्मनी येथील फुल्डा शहराजवळ किर्शहाईम गावात परमहंस श्री स्वामी विश्वानंद महाराज यांनी विठ्ठलधाम मंदिर उभारले आहे. मंदिरात श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा केली आहे. या मंदिरात दि. १९ एप्रिलला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापणा होणार आहे.

त्यासाठी शुक्रवारी देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मूर्ती अर्पण सोहळा आयोजित केला होता. दुपारी तीन वाजता वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांनी पंचपदी सादर केली. यावेळी देवस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, नगराध्यक्ष पूजा दिवटे माजी विश्वस्त नितीन महाराज मोरे, संजय बालवडकर, पी. आर. पाटील, सुनीलमहाराज मोरे, सूर्यकांत मोरे, लक्ष्मण मोरे, प्रमोद भावसार, अनिल कुमार शर्मा, जगराम चौधरी, राजकुमार फडतरे, सुनील कौशिक आदी उपस्थित होते. यावेळी देहू देवस्थानाचे अध्यक्ष यांनी आत्मा रामानंद ब्रह्मचारी यांच्याकडे मूर्ती सुपुर्द केली.उमेश महाराज मोरे यांनी सूत्रसंचालन केले. 

अशी आहे मूर्ती ....

शाहीर चेतन हिंगे यांनी मूर्ती साकारली केली असून त्याची उंची २५, लांबी १७. ५ आणि रुंदी १० इंच असून वजन ७० किलो आहे.

संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे म्हणाले, देवस्थानाच्या वतीने आजपर्यंत विविध ठिकानच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यासाठी तुकोबारायांच्या मूर्ती दिल्या असून अकरावी मूर्ती ही जर्मनी येथील विठ्ठल धाम मंदिरात प्रतिष्ठापित होणार आहे. याचा मोठा आनंद आहे.'

माजी अध्यक्ष नितीनमहाराज मोरे म्हणाले, मी अध्यक्ष असताना जर्मनीतील नागरिक आषाढी वारीमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी देहू दर्शनही केले होते. जर्मनी येथे विठ्ठलधाम मंदिर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती. वारकरी संप्रदायाचे पाया आणि कळस अर्थात ज्ञानोबा-तुकोबांची मूर्ती जर्मनीस घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार तेथे येत्या दि. १९ एप्रिलला अक्षय्यतृतीयेस तुकोबांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. विठ्ठलधाम मंदिरात देहूतून नेलेली तुकाराम महाराजांची मूर्ती, तर आळंदीतून नेलेली ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात अडीचशे किलो चांदीचा वापर करून रथयंदाच्या पालखी सोहळ्यात अडीचशे किलोचा चांदी वितळून रथ तयार करण्यात येणार आहे. त्याचे संकल्पचित्र यावेळी सादर केले. पुण्यातील रमेश मेस्त्री यांनी लाकडाचे डिझाईन तयार केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tukoba's idol departs for Germany amidst joyous Dehu celebrations.

Web Summary : Saint Tukaram Maharaj's idol journeyed to Germany's Vitthal Dham for installation. A ceremony was held in Dehu where the idol was handed over to German devotees. The idol will be installed on April 19th alongside Sant Dnyaneshwar Maharaj's idol. The idol is 25 inches tall, 17.5 inches long, 10 inches wide, and weighs 70 kg.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र