शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार अध्यक्ष असलेली संघटनाच मतदानास अपात्र;महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:54 IST

- कबड्डी, कुस्ती व इतर खेळांच्या संघटना मताधिकार यादीतून वगळल्या : पात्र राज्य संघटनांचे मतदानाचे अधिकार डावलल्याचा संघटनाचा आरोप; देशी खेळांच्या संघटनांचा समावेश न केल्यामुळे देशी खेळांकडे दुर्लक्ष

- आकाश झगडे

पिंपरी :महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनने संघटनांची मतदान यादी जाहीर केली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनला अपात्र ठरवले आहे. महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपदही पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळे ‘एमओए’च्या अध्यक्षचीच संघटना कशी काय अपात्र ठरली? याबाबत राजकीय आणि क्रीडा वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनने संघटनांची पात्र यादी जाहीर केली आहे. एकूण ४७ खेळांना मान्यता आहे. त्यापैकी २२ संघटनांचा समावेश केला आहे. त्यात कबड्डी आणि कुस्ती अशा अनेक क्रीडा संघटनांचा समावेश केलेला नाही. यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावर ‘एमओए’ने भूमिका जाहीर केली आहे. अनेक संघटनांनी पात्र असून, डावलल्याचा व पत्रव्यवहार केला नसल्याचा आरोप केला आहे.

खेळाडूंचे भविष्य अडचणीत

वगळलेल्या संघटनांना ‘अनधिकृत’ मानले जाऊ शकते. ज्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खेळाडू आणि पालक चिंतेत आहेत. जर प्रमुख संघटनाच यादीत नाहीत, तर हजारो खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे काय? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. पुढील पाऊल काय?

निवडणुकीतून ज्यांना यादीतून वगळले आहे, त्यांना आक्षेप घेण्याची संधी दिली आहे. राज्य सरकार, क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप करून खेळाडूंच्या हिताचे रक्षण करणे गरजेचे आहे, अशी मागणी आहे. 

‘एमओए’च्या सरचिटणीसांनी वर्चस्व राहावे म्हणून पात्र संघटनांचे मतदानाचे अधिकार डावलले आहेत. हे राज्यातील खेळांसाठी घातक आहे.  - संदीप भोंडवे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ‘एमओए’ला चाळीसपेक्षा जास्त संघटना संलग्न आहेत. त्यापैकी बावीस जणांना मतदानाचे अधिकार देणे, यामध्ये खूप मोठे राजकारण दडले आहे.  - शिवाजी साळुंखे, सचिव, महाराष्ट्र कुराश असोसिएशन. तांत्रिक वाद असतील, पण असे डावलणे योग्य नाही. अनेक खेळाडू ग्रेस गुणांपासून वंचित राहिले तर याला पूर्णपणे ‘एमओए’ जबाबदार असेल. - राजाराम राऊत, सचिव, हॅण्डबाॅल असोसिएशन महाराष्ट्र कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे खेळ यादीत समाविष्ट करता येत नाहीत. संबंधित संघटनांना यादीतून वगळल्याची कारणे पत्राद्वारे कळवली आहेत. या यादीवर तक्रारी व आक्षेप घेण्यासाठी २३ तारखेपर्यंत मुदत आहे. - नामदेव शिरगावकर, महासचिव, महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशन

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड