शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

विकास आराखड्याच्या सुनावणीसाठी शासननियुक्त समिती नेमणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:28 IST

सुनावणीसाठी साठ दिवसांची मुदत : समितीत महापालिकेसह सातऐवजी पाच सदस्य; शासन आदेशाची प्रतीक्षा; सुमारे पन्नास हजार हरकती; नियोजन कधी पूर्ण होणार?

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरील सूचना आणि हरकतींची मुदत मागील आठवड्यातच संपली. मात्र, सुनावणीसाठी अजूनही शासननियुक्त समिती नियुक्त न झाल्याने सुनावणीची प्रतीक्षा आहे. सुनावणी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा कालावधी आहे. त्यानंतर आराखडा शासनास पाठविला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग केलेल्या क्षेत्राचा एकत्रित प्रारूप आराखडा तयार केला. शहरातील २०२१ मधील पायाभूत सुविधा लक्षात घेऊन, भविष्यातील २०३१ ची ४२ लाख ४० हजार आणि २०४१ साठी ६१ लाख लोकसंख्या अपेक्षित धरून हा आराखडा तयार केला आहे. तो १४ मे रोजी जाहीर करून सूचना आणि हरकतींसाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता. हा कालखंड १४ जुलै रोजी पूर्ण झाला आहे. त्यात सुमारे ५० हजार हरकती आल्या आहेत. त्यानंतर सुनावणी होईल, असे प्रशासनाकडून जाहीर केले होते. मात्र, अजूनही या संदर्भातील नियोजन झालेले नाही.

नवीन अधिकारी रुजू नाही

भविष्यातील लोकसंख्येत होणारी वाढ विचारात घेऊन कमीतकमी क्षेत्रावर आरक्षणे प्रस्तावित केली होती. आराखड्यात पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत पुणे महापालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामधील (पीएमआरडीए) रस्त्यांची रुंदी निश्चित करण्यात आली आहे, असे महापालिकेचे मत आहे. मात्र, याबाबत ५० हजार हरकती आल्या आहेत. दरम्यान, मुदत पूर्ण झाल्याने महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची बदली झाली. नवीन अधिकारी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे सुनावणीचे नियोजन झाले नाही.

महापालिकेकडून आयुक्त एकमेव

साठ दिवसांच्या मुदतीमध्ये नागरिकांनी हरकती, सूचना सादर दिल्या. आता नियोजन समिती नियुक्त करणे गरजेचे आहे. विकास योजनेमध्ये चांगल्या सूचनांनुसार ही समिती आवश्यक ते बदल करण्याची शिफारस नियोजन प्राधिकरणाकडे करू शकते. नियोजन समितीत महापालिका स्थायी समितीचे तीन सदस्य आणि शासन पातळीवरील वेगवेगळ्या विषयांमधील चार तज्ज्ञ अशा एकूण सात सदस्यांचा समावेश असतो.समितीच्या स्थापनेनंतर दोन महिन्यांत समितीने अहवाल नियोजन प्राधिकरणाकडे सादर करायचा आहे. त्यानंतर कलम ३० अन्वये विकास योजना अंतिम मंजुरीसाठी शासनास सादर करण्यात येईल. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने स्थायी समितीचा एकच सदस्य म्हणजे आयुक्त असणार आहे. त्यामुळे समितीत महापालिकेसह सातऐवजी पाच सदस्य असणार आहेत. शासननियुक्त पाच सदस्यांची घोषणा अजूनही सरकारने केलेली नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड