शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
3
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
4
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
5
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
6
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
7
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
8
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
9
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
10
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
11
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
12
वरमाळा पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
13
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
14
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
15
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
16
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
17
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
18
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
19
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
20
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान

भोसरीतून प्रवाशांची संख्या वाढली; पण पीएमपी बसेस कधी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:29 IST

- प्रशासनाचा कानाडोळा : बसथांब्यावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या जादा गाड्या सोडण्याची प्रवाशांची मागणी

- अंगद राठोडकरभोसरी : भोसरी पीएमपी बसथांब्यावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. पीएमपी बसची वारंवारता वाढविण्यात यावी, अशी मागणी प्रवाशाकडून होत आहे. मात्र, प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर, पण ४ जागांमुळे युती तुटली; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

भोसरी येथील पीएमपी बस थांब्यावरून आळंदी, वाघोली, पुणे स्टेशन, पुणे महापालिका, हडपसर, हिंजवडी, कोथरूड डेपो, वारजे माळवाडी, कात्रज, राजगुरूनगर, म्हाळुंगे, वासुली, तळेगाव येथे गाड्या नियमित ये-जा करतात. यात प्रामुख्याने आळंदीकडे नियमित जाणाऱ्या ६ गाड्या, पुणे स्टेशनकडे १२, वाघोलीकडे जाणाऱ्या सध्या ७ गाड्या सुरू आहेत; परंतु अनेकदा वाहतूक कोंडीमुळे या नियमित वेळेत धावणाऱ्या गाड्या अनेकदा गंतव्यस्थानी वेळेत पोहोचू शकत नाहीत. या मार्गावरील नेहमीच्या प्रवाशांची गर्दी विचारात घेता प्रत्येक ठिकाणच्या बसची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

हडपसरसाठी एकूण १२ गाड्या आहेत, मात्र त्यातील ७ गाड्या बंद आहेत. पुणे स्टेशन १२ गाड्या, हिंजवडीसाठी एकूण १४ गाड्या आहेत. मात्र त्यातील केवळ ५ गाड्या सुरू आहेत. महापालिकेसाठी ११ गाड्या आहेत. मात्र, त्यातील केवळ १० गाड्याच सुरू आहेत. वारजे- माळवाडीसाठी १६ गाड्या आहेत. कात्रजसाठी एकच गाडी आहे. कोथरूड डेपोसाठी ४ गाड्या आहेत, तर राजगुरूनगर या मार्गावर १६, म्हाळुंगे १२, वासुली ५ तर तळेगावसाठी ८ गाड्या नियमित सुरू आहेत.कधी चार्जिंग नाही तर कधी तांत्रिक बिघाड

ज्या गाड्या आहेत, त्यातील अनेक गाड्या कधी चार्जिंग अभावी तर कधी तांत्रिक बिघाड झाल्याने अचानकच रस्त्यात बंद पडतात. त्यामुळे प्रशासनाने आळंदी, वाघोली, पुणे स्टेशन, महापालिका, कोथरूड डेपो, कात्रज, राजगुरूनगरसारख्या मार्गावरील गाड्यांमध्ये तत्काळ वाढ करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

मी आळंदीत राहतो, भोसरी एमआयडीसी येथे कंपनीत कामाला जातो. वेळेवर बस मिळत नाही, मिळाली तर प्रचंड गर्दी असते. बसची संख्या वाढविण्याची गरज आहे. - प्रफुल्ल माने, कामगार, भोसरी मी हिंजवडीत एका आयटी कंपनीत कामाल जातो, बस वेळेवर मिळत नसल्याने अनेक वेळा घरी बसावे लागते. - अभिषेक यादव, प्रवासी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीcivic issueनागरी समस्या