शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कारण- राजकारण : भावी उमेदवार समाज माध्यमांवर व्यस्त; जनतेशी संवादाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:21 IST

- भावी उमेदवारांनी थेट संवाद टाळला; नागरिकांच्या अपेक्षांना तडा, “कोण आपला-कोण परका?” या प्रश्नावर मतदारांमध्ये चर्चा तीव्र

- अमृता दातीर-जोशी 

सांगवी : जोडून आलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या या भावी उमेदवारांना लोकांशी थेट संपर्क वाढवण्याची, स्थानिक प्रश्न समजून घेण्याची आणि स्वतःची उपस्थिती दाखवण्याची उत्तम संधी होत्या. मात्र काही अपवाद वगळता बहुतांश इच्छुकांनी ही संधी वाया घालवली. समाजमाध्यमांवर मात्र ते सक्रिय दिसले, पण जनतेशी प्रत्यक्ष संवादात मात्र स्पष्ट अभाव जाणवला.निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर निवडणूक प्रक्रियेला वेग येणार हे निश्चित आहे. तरीसुद्धा संभाव्य उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधण्याऐवजी नेतेमंडळी व पक्षश्रेष्ठींशी जवळीक साधण्यासच अधिक प्राधान्य दिले.

आरक्षण, प्रभागरचना, युती, आघाडी की स्वबळ अशा अनेक अनिश्चिततेमुळे उमेदवारीच्या शक्यता धूसर आहेत. या धाकधुकीमुळे अनेक इच्छुकांनी थेट लोकांमध्ये जाणे टाळले, असे जाणकार सांगतात. मात्र समाजमाध्यमांचा वापर त्यांनी जोमाने केला असून, शुभेच्छा संदेश, छायाचित्रे आणि “मी लोकांमध्ये आहे” अशा प्रकारच्या पोस्टचा अक्षरशः पूर आलेला दिसतो.सार्वजनिक भेटीगाठींना बगल; जनतेत नाराजी

दिवाळीच्या सणानिमित्त काही सामाजिक संस्थांनी आणि गृहसमित्यांनी उमेदवारांना स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. पण अनेकांनी अशा उपक्रमांना प्रतिसाद दिला नाही. जनतेने पुढाकार घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. नेत्यांच्या उपस्थितीपेक्षा उमेदवाराच्या कामाचा आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाचा जनतेला अधिक महत्त्व वाटते. पण या दिवाळीत लोकांच्या अपेक्षांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, हा मतदारांसाठी निराशाजनक अनुभव ठरला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकच प्रश्न गुंजू लागला आहे – “कोण आपला? कोण परका?” आता हा निर्णय अत्यंत सावधपणे घेण्याची वेळ आली आहे.पुढील निवडणुका ठरवतील दिशादर्शक

येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांचा विश्वास कोणावर बसतो, हेच राजकारणाची दिशा ठरवेल. “कार्य महत्त्वाचे की व्यक्ती की पक्ष?” या प्रश्नाचा विचार आता मतदार करू लागले आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. शहर आणि गावठाण परिसरातील कचरा, रस्ते, पाणीपुरवठा यांसारखे अनेक मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या अडचणी दुय्यम ठरत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Election Hopefuls Prioritize Social Media Over Public Engagement, Sparking Discontent

Web Summary : Aspiring candidates favored social media over direct public contact during Diwali, missing opportunities to address local issues. Voters express disappointment as crucial community dialogues were neglected, raising questions about candidates' commitment to the people.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड