शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-Chinchwad : नवी मुंबई महापालिकेच्या जुन्या गाड्यांचा शहरात कचरा संकलनासाठी होणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:07 IST

- शहरातील अनेक भागांमध्ये कचरा उचलण्यास विलंब, कचऱ्याचे ढिगारे रस्त्यांवर पडून

रावेत :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेत सध्या मोठा गोंधळ उभा आहे. कचरा संकलनासाठी निवडलेल्या ठेकेदाराने नवी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या जुने, नादुरुस्त आणि अकार्यक्षम वाहनांचा वापर सुरू केला असल्याचे उघड झाले आहे. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये कचरा उचलण्यास विलंब होत असून, कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे रस्त्यांवर साचलेले दिसत आहेत.

कचऱ्यामुळे होणारी दुर्गंधी नागरिकांना त्रस्त केले आहे. नागरिकांकडून महापालिकेवरून कचरा व्यवस्थापनातील ही घुसमट टाळण्याची आणि वेळोवेळी समस्या दुरुस्त करण्याची मागणी जोर पकडली आहे.

पालिकेला त्वरित कठोर पावले उचलून ही गोंधळे लवकरात लवकर दूर करण्याचा मार्ग आखण्याची गरज निर्माण झाली आहे. कचरा संकलनात झालेल्या या प्रकारावर महापालिकेने तत्काळ तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने ही समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठेकेदाराच्या ताफ्यातील सर्व गाड्यांची तत्काळ फिटनेस तपासणी करण्यात येईल. जी वाहने सुस्थितीत नाहीत, त्यांना सेवेतून हटवण्यात येईल आणि संबंधित ठेकेदाराला त्या गाड्या वापरण्यास बंदी घालण्यात येईल. नवी मुंबईऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेसाठी असे वाहनावर बदल करण्याचे आदेश देण्यात येतील. - सुधीर वाघमारे, सहायक आरोग्य अधिकारी, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय कचऱ्याचा ठेका पिंपरी-चिंचवड महापालिकेचा असताना फिटनेस नसलेल्या व वारंवार बंद पडणाऱ्या गाड्यांचा वापर होणे ही शहरवासीयांसाठी धक्कादायक बाब आहे. संबंधित विभागाने ठेकेदाराची सखोल चौकशी करून त्याचा ठेका तत्काळ रद्द करावा. -  संदीप भालके, सामाजिक कार्यकर्ते, वाल्हेकरवाडी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड