शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्रीच ‘डीजेमुक्ती’...! नागरिकांच्या मनस्तापाला जबाबदार कोण?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 9, 2025 16:04 IST

- महापालिका-प्रदूषण मंडळाच्या आकडेवारीत तफावत, पोलिसांची दिखाऊ कारवाई

पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीत पिंपरी-चिंचवड शहर अक्षरशः डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने हादरले. १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवल्याचा दावा केला असतानाही महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीत आकाश-पाताळाचा फरक असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनी केवळ पाच मंडळांवर गुन्हे दाखल करून जबाबदारी झटकली आहे.

शहरातील विविध मंडळांकडून डीजे, साउंड सिस्टीम आणि ढोल-ताशांचा धडाका सुरू होता. दारे-खिडक्या लावूनही घरातील वस्तू कंपनामुळे हलू लागल्या, असा अनुभव नागरिकांनी सांगितला. रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला रात्रभर मनस्ताप सहन करावा लागला. मात्र अधिकृत पातळीवर “मर्यादित डेसिबल आवाज” असल्याचा दावा केल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

फक्त नोटिसांचा फार्स

प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या आकडेवारीच्या आधारे पोलिस फक्त नोटिसा बजावतात. पण त्यानंतर कारवाई होत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक उपाययोजना न झाल्यास डीजेमुक्ती ही केवळ कागदोपत्री राहील, अशी संतप्त टीका नागरिकांनी केली आहे.

सोलापूरने दाखवली दिशा..!

सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे डीजेमुक्त विसर्जन पार पडले. मर्यादित आवाजात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका झाल्या. मग पिंपरी-चिंचवडमध्ये असे ठोस पाऊल उचलले जात नाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.आवाजाची कमाल पातळी (प्रदूषण नियंत्रण मंडळ)

परिसर - २०२५ (कमाल पातळी डेसिबलमध्ये)

पिंपरी (शांतीनगर) - १०५.१

चिंचवड (चापेकर चौक) - १०६.२

भोसरी - ८८.४

 

आवाजाची कमाल पातळी (महापालिका)

परिसर - २०२५ (कमाल पातळी डेसिबलमध्ये)

सांगवी (पवनानगर) : ७८.७

भोसरी (बस टर्मिनल) : ८३.४

मोशी घाट : ८६.७

निगडी (भक्ती-शक्ती, चौक) : ८७.९

पिंपरी (सुभाषनगर) : ८९.३ 

अधिकाऱ्यांचे दावे 

“महापालिकेच्या यंत्रणेकडून शहरातील प्रमुख ठिकाणी आवाजाची पातळी मोजली जाते. मर्यादेपेक्षा आवाज जास्त असल्यास संबंधित मंडळांना नोटीस बजावली जाईल.” - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका

 “गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवाजाची पातळी आणखी वाढली आहे. सर्वच ठिकाणी आवाज सर्वसामान्य मर्यादेपेक्षा अधिक होता.” - मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव