शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

महायुतीत स्वबळाचे दावे, मविआत एकजुटीची धडपड..! भाजप-राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:51 IST

- काँग्रेस-शिवसेना-शरद पवार गट आघाडीसोबत जागा वाढवण्याच्या प्रयत्नात

- ज्ञानेश्वर भंडारेपिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असतानाच राजकीय घडामोडींतही चुरस वाढली आहे. विशेषत: सत्ताधारी महायुतीमध्ये ‘स्वबळावर लढायचे की मित्रपक्षांसोबत?’ या प्रश्नावर विचारमंथन सुरू असून, गोपनीय सर्वेक्षणे, इच्छुकांची चाचपणी आणि गुप्त राजकीय बैठका जोरात सुरू आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडी मात्र एकत्रित लढण्याच्या तयारीत दिसते.

भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी हे महायुतीतील दोन मोठे खेळाडू. राज्यात एकत्र असले तरी पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक पातळीवर दोघांतील स्पर्धा लपून राहिलेली नाही. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या गडात घुसून तब्बल ७७ जागा मिळवून सत्ता हस्तगत केली होती, तर राष्ट्रवादीला केवळ ३६ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत जर एकत्र लढायचे ठरवले, तर जागावाटपाचा तिढा अपरिहार्य ठरणार आहे.

भाजपकडे स्वतंत्रपणे प्रत्येक प्रभागात पॅनल उभे करण्याची ताकद असल्याचा आत्मविश्वास आहे. राष्ट्रवादीलाही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर जाण्याची इच्छा आहे. दोन्ही पक्षांकडून वरिष्ठ पातळीवर स्पष्ट संदेश गेला आहे. “युती केली तर जागा गमवाव्या लागतील; पण स्वबळावर लढलो तर सत्ता आपल्या हाती राहील.” 

मविआत एकजुटीची धडपड

महाविकास आघाडीत शरद पवार गटाची राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस एकत्रितपणे लढण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेला तिन्ही जागा शरद पवार गटाने लढवल्या; पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘एकत्र येऊन महापालिकेत किमान ५०-६० जागा मिळवू’ हा त्यांचा प्रयत्न आहे.

सर्व्हेच्या फेऱ्या आणि गुप्त राजकारण...

दोन्ही आघाड्यांनी शहरात गुप्त सर्वेक्षणे केली आहेत. प्रत्येक प्रभागात किती ताकद आहे, पूर्ण पॅनल उभा करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या हालचाली, स्थानिक पातळीवरील मतदारसंघातील समीकरणे, ओबीसी-बहुजन मतदारांची ताकद, महिलांचे आरक्षण या सर्व बाबींची बारकाईने तपासणी होत आहे. 

स्थानिक संशयकल्लोळ कायम

वरिष्ठ पातळीवर युतीचा निर्णय झाला तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते तो कितपत मान्य करतील, हा मोठा प्रश्न आहे. कारण, भाजप-राष्ट्रवादीमध्ये अनेक प्रभागांत दोस्तीपेक्षा कटुता अधिक आहे. २०१७ मध्ये भाजप उमेदवारांना हरवण्याचा प्रयत्न करणारे काही नेते आता राष्ट्रवादीत दाखल झाले असून, महायुतीतच आहेत. त्यामुळेच ‘मित्रांपेक्षा शत्रू कमी त्रास देतो’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

उमेदवारी फिक्स म्हणत तयारीला...

प्रभाग रचना अंतिम झालेली नसतानाही काही इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झाल्याप्रमाणे काम सुरू केले आहे. विशेषतः भाजपमधील आमदार समर्थक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. “आमदारांनी उमेदवारी फिक्स केली आहे,” असे सांगत ते आपापल्या भागात सभा, मोर्चे आणि बॅनरबाजी करत आहेत. यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024