पिंपरी : महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचा अहवाल मंगळवारी (दि. ५) राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर केला, महापालिकेने चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांचे नकाशे तयार केले आहेत.२०११च्या लाेकसंख्येप्रमाणेच प्रभाग रचना तयार केली आहे. तळवडे-चिखली भागातून प्रभाग रचना सुरू करून सांगवी-दापाेडी अशा उतरत्या क्रमाने पूर्ण केली आहे.ही प्रभाग रचना मंगळवारी (दि. ५) राज्य शासनाला सादर केली. १ प्रभाग ४९ हजार ते ५६ हजार मतदार संख्येचा असणार आहे. महापालिकेचे एकूण ३२ निवडणूक प्रभाग असणार आहेत. या प्रभागामधून १२८ नगरसेवकांना मतदार निवडून देतील. त्यातील ६४ जागांवर महिला नगरसेविका असतील.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे नगरविकास विभागाला सादर केले आहेत. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग