शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

पहा हे स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्ते आणि खड्डे ...! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:49 IST

'ही कसली स्मार्ट सिटी?' 'खड्ड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.' 'अधिकारी आणि नेते झोपलेत का?' अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

पिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून लौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पाऊस संपला तरी रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत; त्यामुळे सोशल मीडियावर रस्त्यांवरील खड्डे व्हायरल होत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात मार्चपासून पावसाला सुरुवात झाली. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. नोव्हेंबर आला तरी अधूनमधून पाऊस पडतच आहे. पावसामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्यावर, त्याचबरोबर मुंबई-बंगळुरू महामार्गावरील किवळेपासून ते वाकडपर्यंतच्या सेवा रस्त्यावर, पुणे-नाशिक रस्त्यावरील नाशिक फाटा ते मोशी सेवा रस्त्यावर, रूपीनगर ते तळवडे आणि तळवडे ते आळंदी फाटा रस्त्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.निगडी ते मोरवाडी या टप्प्यात मेट्रोचे काम सुरू आहे. त्याचबरोबर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अनेक वेळा खड्डे बुजविले आहेत. मात्र, त्याचा उपयोग झालेला नाही. तात्पुरती डागडुजी केली जात आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संत तुकारामनगर येथील व्हिडीओ व्हायरलवल्लभनगर येथे एसटी स्थानक आहे. महामार्ग ते संत तुकारामनगर या रस्त्यावर बसस्थानकासमोरच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. एका खड्ड्यात वाहने अडकल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये महापालिकेचे एक चारचाकी वाहन तसेच एका व्यक्तीची दुचाकी अडकली आहे. ती गाडी काढण्यासाठी इतर वाहनचालक मदत करत आहेत, असा व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येत आहे. त्यावर 'ही कसली स्मार्ट सिटी?' 'खड्ड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.' 'अधिकारी आणि नेते झोपलेत का?' अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad's Smart City Roads Marred by Potholes; Video Goes Viral

Web Summary : Pimpri-Chinchwad's roads, despite its 'Smart City' status, are riddled with potholes after heavy rains. Viral videos show vehicles stuck, sparking public anger and calls for accountability from officials regarding the hazardous road conditions.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा