शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
7
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
8
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
9
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
10
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
11
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
12
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
13
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
14
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
15
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
16
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
17
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
18
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
19
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
20
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

Heavy Rain : जोरदार पावसामुळे नाले तुंबले, रस्त्यांवर साचली पाण्याची तळी

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: June 8, 2025 14:53 IST

महापालिका प्रशासनाचे अपयश चव्हाट्यावर : रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांसह वाहनचालकांची तारांबळ; वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी, नोकरदार-विद्यार्थ्यांना मनस्ताप 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी सकाळीच (दि. ६) मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाण्याची तळी साचली. नाले तुंबल्याने, रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक मंदावली, तर काही ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे मोठी कोंडी निर्माण झाली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. महापालिका प्रशासनाचे अपयश पुन्हा चव्हाट्यावर आले.

शहरातील मोशी, भोसरी, आकुर्डी, वाकड, थेरगाव, चिखली, पिंपळे सौदागर आणि भोसरी या भागांत पावसाचे विशेष प्रमाण नोंदवण्यात आले. अनेक शासकीय-निमशासकीय आणि खासगी नोकरदार व विद्यार्थ्यांना पावसामुळे वेळेवर पोहोचण्यात अडचणी आल्या. महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, हवामान विभागाने रविवारीही (दि.७) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तुरळक ठिकाणी वीज कोसळण्यासह वादळ, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.रस्त्याला तळी-नद्यांचे स्वरूप

शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, भोसरी एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी देहूरोड–कात्रज बाह्यवळण रस्त्यावर व वाकड येथील इंदिरा कॉलेजसमोर, टेल्को रोड, लांडेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्याने वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना नदी ओलांडल्याचा अनुभव आला. 

घराबाहेर पडताना काळजी घ्याया पार्श्वभूमीवर प्रशासन आणि महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून, जलजमाव झालेल्या भागांतून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, थेरगाव येथील महापालिका रुग्णालय परिसरासह शहरातील इतर भागातही झाडे कोसळल्याचे प्रकारही समोर आले आहेत. नागरिकांनी शक्यतो घरात राहावे, घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, विजेच्या खांबांपासून व झाडांपासून दूर रहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महापालिका म्हणते, पाऊस जास्त झाला !शनिवारी सकाळच्या वेळेत अगदी कमी वेळात जोरदार पाऊस झाला. नाल्यांमधून पाणी जाण्यास उशीर झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. काही ठिकाणी अर्ध्या तासात पाणी मोकळे झाले, तर काही ठिकाणी पाणी जाण्यास दोन ते तीन तास उशीर झाला.  - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेRainपाऊस