पिंपरी : महाराष्ट्र राज्य पोलिस दलात एकूण १५ हजार ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवडपोलिस दलात ४६२ पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी १४,७७९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. भरतीला बुधवारपासून (दि. ११ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडांगण येथे मैदानी चाचणी केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी शारीरिक चाचणी भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील मैदानावर होणार आहे. या मैदानावर यापूर्वीच्या पोलिस भरतीसाठीची मैदानी आणि शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या मैदानात सिंथेटिक ट्रॅक आहे. मैदानी चाचणीसाठी दररोज ५०० ते ८०० उमेदवार बोलावले जात आहेत. मैदानी चाचणीसाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे, आरएफआयडी, बायोमेट्रिक्स आदींचा वापर केला जात आहे. तसेच लेखी परीक्षेतही गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
पोलिस होण्यासाठी उमेदवारांना ५० गुणांची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. यात पुरुषांसाठी १६०० मीटर, १०० मीटर धावणे, तसेच गोळाफेक चाचणी घेतली जाईल. महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जाणार आहे. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना उपलब्ध जागांनुसार एकास दहा या प्रमाणात गुणानुक्रमे लेखी परीक्षेला बोलविले जाणार आहे. जागांमध्ये वाढ
गेल्या वर्षी जाहीर झालेल्या पोलिस भरतीनुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ३२२ जागा भरल्या जाणार होत्या. दरम्यान, आयुक्तालयांतर्गत नव्याने दोन पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. तसेच काही पोलिस अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली. त्याअनुषंगाने आयुक्तालय प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार शासनाने ३२२ वरून ४६२ जागा भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे अधिक उमेदवारांना पोलिस होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Web Summary : Pimpri-Chinchwad police recruitment begins with field tests at Bhosari's synthetic track. 14,779 candidates applied for 462 positions. Men will run 1600m, women 800m, plus sprints and shot put. Increased vacancies offer more opportunities.
Web Summary : पिंपरी-चिंचवड पुलिस भर्ती भोसरी के सिंथेटिक ट्रैक पर शारीरिक परीक्षण के साथ शुरू। 14,779 उम्मीदवारों ने 462 पदों के लिए आवेदन किया। पुरुषों को 1600 मीटर, महिलाओं को 800 मीटर दौड़ना होगा, साथ ही स्प्रिंट और शॉट पुट भी होगा। रिक्तियों में वृद्धि से अधिक अवसर।