शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट लेटरहेड, बनावट स्वाक्षऱ्या, बनावट नियुक्तिपत्रे; नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचा उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:28 IST

- आर्थिक व्यवहार न करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अधिकृत नोकरभरती प्रक्रिया सुरू नसतानाही काही अज्ञात व्यक्तींनी शहरातील तरुणांना बनावट नियुक्तिपत्रे देऊन फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक बेरोजगार तरुण आर्थिक फसवणुकीचे बळी ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेकडून सध्या कोणत्याही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीही काही व्यक्तींनी महापालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तिपत्रे तयार केली आहेत. या पत्रांमध्ये उमेदवारांची निवड झाल्याचे नमूद करत नियुक्तीची तारीखही १ एप्रिल २०२६ दिली आहे. तसेच पत्रात १६ हजार रुपये पगार आणि १६ हजार रुपये महागाई भत्ता असा उल्लेख करून तीन महिन्यांचा चाचणी कालावधी असल्याचे नमूद केले आहे.

याशिवाय, रुजू होताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल, अशी अट आहे. ही नियुक्ती कायमस्वरूपी असून, महापालिकेच्या सेवा नियमावलीच्या अधीन राहील, असेही नियम पत्रात नमूद केले आहे. नियुक्तिपत्रासोबत रुजू होण्याची तारीख आणि विभागाचे नावही देण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणामागे एखादे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील वाढती बेरोजगारी आणि सरकारी नोकरीची ओढ लक्षात घेता काही भामट्यांनी ही संधी साधल्याचे बोलले जात आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

महापालिकेकडून सध्या कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याचे प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे. नोकरभरतीची प्रक्रिया असेल तर त्याबाबतची माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांची निवड ही पारदर्शक पद्धतीने केली जाते आणि कोणत्याही प्रकारचे रोख व्यवहार किंवा मध्यस्थांमार्फत पैसे घेतले जात नाहीत. त्यामुळे अशा फसवणुकीपासून तरुणांनी सावध राहावे. - मनोज लोणकर, सहआयुक्त, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Fake job racket dupes youth with bogus Pimpri-Chinchwad letters.

Web Summary : A fake job racket in Pimpri-Chinchwad defrauded unemployed youth with forged appointment letters promising jobs in the Municipal Corporation. Victims were lured with fake documents and financial demands. Police investigation urged.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६