शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत खर्चमर्यादा वाढविल्याने सामान्य इच्छुक उमेदवारांमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:56 IST

- महापालिका निवडणुकीत १३ लाखांच्या मर्यादेचा निर्णय श्रीमंत उमेदवारांच्या पथ्यावर पडणार का?, सामान्य इच्छुकांपुढे अडथळ्यांचा डोंगर, निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या सबळ उमेदवाराशी स्पर्धा करणे अधिक कठीण होणार

- अतुल क्षीरसागररावेत : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नगरसेवक पदासाठीच्या खर्चाची मर्यादा १० लाखांवरून थेट १३ लाख रुपये केली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय गोटात आनंद, पण सामान्य इच्छुकांमध्ये चिंता आहे.

आयोगाने दिलेल्या कारणांनुसार, प्रचार साधनांचा वाढता खर्च, सोशल मीडियाची व्याप्ती आणि महागाई लक्षात घेऊन ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या निर्णयावर मतभेद आहेत. काहींचे मत आहे की, हा निर्णय श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सबळ इच्छुकांसाठीच अनुकूल आहे. सामान्य उमेदवारांची निवडणुकीतील स्पर्धा आता अधिक कठीण होणार आहे. कारण आर्थिकदृष्ट्या सबळ उमेदवार अधिक खर्च करू शकणार आहेत, परंतु सामान्य इच्छुक उमेदवार तितका अधिक खर्च करू शकणार नाहीत.

निवडणुकीत प्रचार वाहन, बॅनर, होर्डिंग्ज, जनसंपर्क सभा, स्नेहभोजन तसेच डिजिटल जाहिरातींवर प्रचंड खर्च होतो. त्यामुळे ज्या उमेदवारांकडे आर्थिक पाठबळ आहे त्यांना मोठा फायदा होणार अशी सर्वसाधारण चर्चा आहे. 

श्रीमंत उमेदवारांना नवसंजीवनी....

महापालिकेच्या १२८ प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागात मतदारसंख्या मोठी आहे. १३ लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा मिळाल्याने प्रचार अधिक भव्य करता येईल असे काही प्रस्थापित उमेदवारांचे मत आहे. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीनेही हा निर्णय सोयीचा ठरणार आहे. कारण, श्रीमंत इच्छुक प्रचार स्वतःच्या पैशांवर चालवू शकतात, त्यामुळे पक्षाच्या खिशावर ताण कमी येतो. 

सामान्य इच्छुकांच्या मनात अस्वस्थता

पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, मध्यमवर्गीय व्यावसायिक आणि तरुणांनी आगामी निवडणुकीत उमेदवारीची तयारी केली होती. मात्र, खर्चमर्यादा वाढल्यानंतर त्यांची चिंता वाढली आहे. जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे, पण आता खर्चाच्या मर्यादेमुळे उमेदवारीच आवाक्याबाहेर गेली आहे, अशी भावना एका इच्छुक सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केली. निवडणूक आयोगाची अडचण पारदर्शकता राखावी कशी?

खर्चमर्यादा वाढवल्याने उमेदवारांकडून होणाऱ्या गुप्त खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रचार काळात उमेदवाराकडून होणाऱ्या रोखीतील व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते. यामुळे आयोगासमोर पारदर्शकतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

पक्षश्रेष्ठींची कोंडी आणि गोटातील हालचाली...

प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग लागली आहे. खर्चमर्यादा वाढल्याने पक्षश्रेष्ठीदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावशाली उमेदवारांनाच प्राधान्य देतील, अशी शक्यता आहे. यामुळे ‘काम करणाऱ्यापेक्षा, खर्च करणाऱ्याला संधी’ ही भावना पक्षातील तळागाळात वाढताना दिसते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Increased Election Spending Limit Worries Common Candidates in Pimpri-Chinchwad

Web Summary : Pimpri-Chinchwad's increased election spending limit favors wealthy candidates, disadvantaging common aspirants. This raises concerns about fair competition and transparency, potentially prioritizing financial strength over dedication. Parties may favor affluent candidates, impacting grassroots workers.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024