शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : स्थायी समिती सभेत उपसूचनांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:38 IST

शहरविकास, पायाभूत सुविधा आणि नामांतरासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पिंपरी : महापालिकेची स्थायी समिती सभा सोमवारी (दि.१६) झाली. यात सत्ताधाऱ्यांकडून उपसूचनांचा पाऊस पाडला. विविध निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शहरविकास, पायाभूत सुविधा आणि नामांतरासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

चिंचवड येथील सिटी सेंटरसाठी राखीव जागेत ‘अजित पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्याची उपसूचना मंजूर करण्यात आली. सायन्स पार्कसमोरील या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव दरवर्षी होत असला, तरी तो अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही. त्यामुळे नव्या प्रस्तावाची चर्चा रंगली.

सांगवी-बोपोडी पुलासाठी ६० कोटींहून अधिक खर्च करूनही अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने वापर मर्यादित राहिला आहे. त्यामुळे या पुलाला जोडणारे रस्ते १८ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर, पवनानगर, काळेवाडी येथील उद्यान आरक्षण रद्द करून ते निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढवून १० करण्याचा निर्णय घेत, त्यांना किल्ल्यांची नावे देण्याचा प्रस्तावही मंजूर झाला.

याशिवाय यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी १ कोटींचे अनुदान, कनिष्ठ अभियंता पद भरतीतील बदल, रस्ते विकासासाठी नुकसानभरपाई, तसेच विविध चौक व पूल नामकरणाचे प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आले. दरम्यान, उपसूचनांचा भडिमार करत महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले असले, तरी नियोजन आणि प्राधान्यक्रमांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Standing Committee Meeting: Torrent of Sub-proposals Approved

Web Summary : Pimpri-Chinchwad Standing Committee approved various decisions, including an international sports university, road widening, and renaming proposals. A surge of sub-proposals led to approvals, raising questions about planning priorities. Increased regional offices from eight to ten were also approved.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड