शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

चुकारांना घरी पाठविणार - महापौरांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 6:43 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. सत्ता येऊन सहा महिने झाले. मात्र, अधिकारी कामे करीत नसल्याने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. सत्ता येऊन सहा महिने झाले. मात्र, अधिकारी कामे करीत नसल्याने सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली. ‘ही लास्ट वॉर्निंग आहे. कामे करायचे असेल तर करा, नाहीतर कार्यमुक्त व्हा. कामचुकार अधिकाºयांना पाठीशी घालणार नाही. कडक कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा महापौर नितीन काळजे आणि पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला. पाण्याची कृत्रिम टंचाई, गंभीर झालेली कचरा समस्या याबाबत सत्ताधाºयांनी नाराजी व्यक्त केली.मागील आठवड्यात भाजपाच्या वतीने झालेल्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नेत्यांची कानउघाडणी केली होती. ‘माझ्यामुळे सत्ता आली असे कोणी म्हणत असेल, तर ही बाब चुकीची आहे. सत्ता भाजपामुळे आली आहे’, असा चिमटाही काढला होता. त्यानंतर आज महापालिकेत महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी अधिकाºयांसमवेत बैठक घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी झाडून उपस्थित होते. सुमारे चार तास बैठक सुरू होती. कार्यप्रणाली सुधारण्यासाठी अधिकाºयांना १५ दिवसांची मुदत दिली आहे.पक्षनेते पवार म्हणाले, ‘‘सहा महिने अधिकाºयांना संधी दिली. महापालिकेत सत्तांतर झाल्याची मानसिकता अद्यापही अधिकाºयांची झालेली नाही. टिपिकल पद्धतीने काम सुरू आहे. हे संथगती कामकाज योग्य नाही. शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. कचºयाचे साम्राज्य आहे. संपूर्ण शहराला विनापरवाना फलकांचा विळखा पडला आहे. या समस्या लवकर सोडविण्याबाबत अधिकाºयांना कडक सूचना दिल्या आहेत. नागरिकांना दर्जेदार सेवा पुरविली पाहिजे. कामात तत्परता दाखवावी. यापुढे पाट्या टाकणाºया अधिकाºयांची गय करणार नाही. कामात दिरंगाई केल्यास घरचा रस्ता दाखविण्यात येईल. ’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड