पिंपरी शहरात पेट्रोलचे भाव नव्वदी पार, डिझेल ८० च्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 03:51 PM2021-01-06T15:51:42+5:302021-01-06T15:52:10+5:30

पुण्यात सीएनजीला किलोमागे ५५.५० आणि पिंपरी चिंचवड, हिंजवडी आणि चाकण भागात ५४.८० रुपये मोजावे लागत आहेत.

Petrol price has crossed 90 per liter, diesel at 80 per cent In Pimpri city | पिंपरी शहरात पेट्रोलचे भाव नव्वदी पार, डिझेल ८० च्या घरात

पिंपरी शहरात पेट्रोलचे भाव नव्वदी पार, डिझेल ८० च्या घरात

Next

पिंपरी : भारतीय जनता पार्टीने काही वर्षांपूर्वी इंधनाच्या वाढत्या किंमतीवरुन सत्ताधारी काँग्रेस पक्षाविरोधात रान पेटविले होते. आता त्याच भाजपाच्या काळातही पेट्रोलचे प्रतिलिटर भाव नव्वदी पार पोहचले असून, डिझेलचे भावही पेट्रोलशी स्पर्धा करताना दिसत आहेत. त्याच बरोबर सीएनजीच्या भावातही किलो मागे दीड रुपयांनी वाढ झाली आहे.

शहरात बुधवारी (दि. ६) शहरात पेट्रोलचे प्रतिलिटर भाव ९०.२५ आणि डिझेलचे भाव ७९.२५ रुपयांवर पोहोचले आहेत. तर, सीएनजीच्या भाव ५५.५० रुपयांच्या घरात गेले आहेत. गेल्या काही महिन्यांत सीएनजीच्या भावात प्रथमच वाढ झाली आहे. सीएनजीचे देशांतर्गत उत्पादन मोठे असल्याने सीएनजीचे दर स्थिर असल्याचे पुरवठादार सांगत होते. मात्र, आता सीएनजीच्या भावातील झालेली वाढ नेमकी कोणत्या कारणाने झाली, याचे उत्तर पुरवठादारांकडे देखील नाही. राज्यात सिंधुदूर्गमध्ये सीएनजीचा सर्वाधिक ५९.८० रुपये प्रतिकिलो दर आहे. पुण्यात सीएनजीला किलोमागे ५५.५० आणि पिंपरी चिंचवड, हिंजवडी आणि चाकण भागात ५४.८० रुपये मोजावे लागत आहेत.

कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑईलचे भाव शून्य डॉलरवर गेले होते. त्यानंतरही काही महिने भाव तीस ते ३५ डॉलर प्रतिबॅरल होते. मात्र या काळातही घटत्या किंमतीचा फायदा ग्राहकांना झाला नाही. उलट नोव्हेंबर-२०२० पासून दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवस तर दररोज काही पैशांची वाढ केली जात होती.
-------------------

प्रतिलिटर इंधन दर रुपयात
तारीख                    पेट्रोल             डिझेल
२० नोव्हेंबर-२०२०     ८७.६७             ७५.७१

२६ नोव्हेबंर-२०२०     ८८.०७            ७६.६४
५ डिसेंबर-२०२०         ८९.४४           ७८.४१

१९ डिसेंबर-२०२०         ९०              ७८.९७
६ जानेवारी-२०२१        ९०.२५          ७९.२५

Web Title: Petrol price has crossed 90 per liter, diesel at 80 per cent In Pimpri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.