शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 20:32 IST

महापालिकेच्या वतीने नालेसफाई आणि स्वच्छता याबाबत धडक मोहीम हाती घेतली आहे

ठळक मुद्देनालेसफाई आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यात येणारप्लास्टिक बंदी कारवाई सुरू 

पिंपरी : शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृह, नालेसफाई, प्लास्टिक बंदी, या प्रलंबित कामांचा आढावा पालिकेच्या आरोग्याच्या विभागाकडून घेण्यात आला. तसेच नालेसफाईत हलगजीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पालिका प्रशासनाने असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेतील आरोग्याच्या प्रश्नाबाबत महापालिकेत बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मनोज लोणकर, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील दैनंदिनपणे उचलला जाणारा ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, शौचालये, स्वच्छतागृहांचे बांधकाम, अनुदान वाटप, दैनंदिन स्वच्छता, मलनिस्सारण व्यवस्था, नालेसफाई, पावसाळी कामे आणि प्लास्टिक बंदीचा आढावा घेण्यात आला. अतिरक्त आयुक्त गावडे म्हणाले, हागणदारी मुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील विविध भागातील झोपडपट्टी परिसरात वैयक्तिक स्वच्छतागृहे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी दहा हजार पाचशे लाभार्थींना स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत. तसेच दीड हजार स्वच्छतागृहे तयार करण्याचे काम सुरू आहे.

कुचराई केल्यास कारवाई महापालिकेच्या वतीने नालेसफाई आणि स्वच्छता याबाबत धडक मोहीम हाती घेतली आहे. याबाबत गावडे म्हणाले,नालेसफाई आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. अचानकपणे ही पाहणी करण्यात येणार आहेत. कामात कुचराई करणारे आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत क प्रभागातील तिघांना दंडही केला आहे. त्यात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे नालेसफाई आणि स्वच्छतेची कामे कर्मचाऱ्यांनी वेळेत कामे करावीत. नालेसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

प्लास्टिक बंदी कारवाई सुरू राज्य शासनाने प्लॉस्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर महापालिका परिसरात कारवाई सुरू केली आहे. दंडात्मक कारवाई सुरू आहे. पाच हजार रुपये दंडही आकारण्यात येत आहे. तसेच प्लास्टिक वापरू नये, याबाबत सामाजिक प्रबोधनही केले जात आहे. प्लास्टिक विषयी जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल, असे गावडे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य