PCMC: सोसायटीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्यास सोसायटी फेडरेशनचा विरोध

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: December 1, 2023 03:00 PM2023-12-01T15:00:47+5:302023-12-01T15:01:07+5:30

नळ कनेक्शन तोडण्याच्या एकतर्फी निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी सोसायटीधारकांनी केली आहे....

PCMC: Societies Federation opposes disconnection of tap connections of society holders | PCMC: सोसायटीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्यास सोसायटी फेडरेशनचा विरोध

PCMC: सोसायटीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्यास सोसायटी फेडरेशनचा विरोध

पिंपरी : महापालिका प्रशासनाकडून शहरातील ४१ सहकारी गृह रचना संस्थांना त्यांचे एसटी बंद असल्याने सोसायटीचे पाण्याचे नळ कनेक्शन तोडण्याच्या एकतर्फी निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी सोसायटीधारकांनी केली आहे.

संबंधित सोसायट्यांच्या बांधकाम व्यवसायिकांनी गृहप्रकल्पामध्ये बसवलेले एसटीपी अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच विकसकाकडून सोसायटी हस्तांतरण करत असताना सदरील एसटीपी हे चालू अवस्थेत नव्हत्या. फक्त याच ४१ सोसायट्यांच्या नव्हे, तर पिंपरी-चिंचवड शहरातील बऱ्याच सोसायट्यांमधील एसटीपी विकसकाकडून सोसायटी हस्तांतरण करत असताना बंद असतात त्या चालू अवस्थेत नसतात, तरी त्या सोसायटीधारकांच्या माथी मारल्या जातात. याबाबत आमच्या फेडरेशन मार्फत आपणाला वेळोवेळी लिखित तक्रारी देखील केलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. तरी पण आपण शहरातील बांधकाम व्यवसायिकांना पाठीशी घालत यावर कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही, असा दावा फेडरेशनने केला आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून सोसायट्यांमधील या एसटीपी यंत्रणेबाबत कोणतीही पाहणी न करता विकसकांना ना हरकत दाखला दिल्या जातात. या सर्वांबाबत फेडरेशन मार्फत वारंवार लिखित तक्रारी करून देखील आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना आणि बांधकाम व्यवसायिकांना पाठीशी घेतली जाते. जोपर्यंत वरील या सर्वांवर कारवाई होत नाही. पर्यंत आम्ही कोणत्याही सोसायटीमधील पाण्याचे नळ कनेक्शन कट करू देणार नाही.

 -संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

शहरातील बरेच बांधकाम व्यवसायिक त्यांच्या गृहप्रकल्पामध्ये बसवत आलेल्या एसटीपी यंत्रणा या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असतात. यूडीसीपीआर मधे अट आहे, एक नियम आहे म्हणून फॉर्मलिटी म्हणून त्या बसवल्या जातात. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून याची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता सदर गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले जातात. महापालिकेची चूक सोसायटीधारकांच्या माथी मारली जात आहे.

- प्राजक्ता रूद्रवार, रावेत-किवळे सोसायटी फेडरेशन

महापालिकेने आधी सार्वजनिक मैलाशुध्दीकरण प्रकल्प आहेत. ते सुस्थितीत चालवावेत. त्यानंतर सोसायट्यांना शहाणपणा शिकवावा. शहरातील ९० टक्के गृहप्रकल्पामध्ये एसटीपी प्रकल्प कार्यान्वित नसताना देखील आपल्या बांधकाम विभागाकडून पार्ट कंम्प्लिशन, (भाग पूर्णत्वाचा दाखला) दिला जातो. त्याचा दंड कोणाला करणार?

- दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन

Web Title: PCMC: Societies Federation opposes disconnection of tap connections of society holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.