शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

PCMC | बाप रे बाप! एका व्हिडीओसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोजले सव्वा लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 15:20 IST

जनजागृतीसाठी लाखो रुपयांचा चुराडा महापालिका करत असल्याचे समोर आले आहे...

- प्रकाश गायकर पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह ही मोहीम राबविण्यात आली. त्याच्या जनजागृतीसाठी रेडिओवर जिंगल्स वाजवण्यात आल्या. यासाठी तब्बल १३ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. तर अवघा एक व्हिडीओ बनविण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे बिल महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने मंजूर केले आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी लाखो रुपयांचा चुराडा महापालिका करत असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षी मोठा गाजावाजा करत स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्पर्धेमध्ये पहिल्या तीन शहरांमध्ये येण्याचा चंग तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी बांधला होता. त्यासाठी रंगरंगोटी, पोस्टर आदी अनेक प्रकारांनी नागरिकांची जनजागृती केली. स्वच्छ सर्वेक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शहर १९ व्या क्रमांकावर फेकले गेले. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. रेडिओवर जिंगल्स वाजवण्यासाठी तब्बल १३ लाख रुपये खर्च झाला. रेडिओच्या चार वाहिन्यांवर याबाबत १ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जनजागृती केली. त्यासाठीच्या १३ लाख रुपये खर्चास स्थायी समितीमध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली. त्यासाठी एक व्हिडीओ पर्यावरण विभागाने तयार केला. त्यासाठी निविदा न काढता अल्प मुदतीची कोटेशन नोटीस काढण्यात आली. त्यामध्ये मे. एसएसडब्ल्यू क्रिएशन यांनी १ लाख २० हजार ५०० रुपये दर सादर केला. त्यांच्याकडून एक व्हिडीओ बनवून घेण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपये मोजण्यात आले. जनजागृतीसाठी तयार करण्यात येणाऱ्या जिंगल्स, व्हिडीओ यावर महापालिका लाखो रुपयांचा खर्च करत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाPuneपुणे