शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

संततधारेमुळे पन्नास टक्के पवना धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:50 IST

आठवडाभरापासून मावळ परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात पवना धरण परिसरात दीडशे मिमी तर लोणावळा शहरात ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसात मावळातील धरणे तुडुंब भरण्याची शक्यतालोणावळ्यात मागील वर्षीची पावसाने सरासरी ओलांडली

पिंपरी : उद्योगनगरीसह मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी असणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के भरले आहे. त्यामुळे उद्योगनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात तरी मिटला आहे.मान्सूनचे शहरात जोरदार आगमन झाले होते. त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, दहा दिवसांपासून पावसाचा जोर सरू आहे. आठवडाभरापासून मावळ परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात पवना धरण परिसरात दीडशे मिमी तर लोणावळा शहरात ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे मावळ आणि मुळशी परिसरातील इंद्रायणी व पवना आणि मुळा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मागील आठवड्यात सांगिसे पूल पाण्याखाली जाण्याची घटना व जलपर्णीमुळे इंद्रायणीला वाकसई भागात पूर आल्याच्या घटना घडल्या होत्या. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसात मावळातील धरणे तुडुंब भरण्याची शक्यता आहे. पावसासोबत वारा असल्याने लोणावळा व परिसरासह मावळात अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरु आहे. रावेत, किवळे भागातही पावसामुळे वीजेचा लंपडाव सुरू आहे.लोणावळ्यात सरासरी ओलांडलीजून महिना संपला तरी सुरु न झालेला मान्सून जुलै महिन्यात लोणावळ्यात चांगलाच सक्रिय झाल्याने अवघ्या पंधरा दिवसात पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. लोणावळा शहरात आज अखेर १८१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेर हा आकडा १७६५ मिमी होता.धरण साठ्यात झाली वाढमावळ आणि मुळशीतील धरणे भरू लागली आहेत. १ जूनपर्यंत साठा २४.४ टक्के असणारे पवना धरण पन्नास टक्के भरले आहे. मावळातील वाडिवळे धरणात ७४ टक्के, आंद्रा धरणात ७० टक्के, कासारसाई धरणात ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सहा दिवसात मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने मावळ मुळशी आणि पिंपरी-चिंचवडचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूरनियंत्रणाची तयारीही महापालिकेने केली आहे. .................................................................................अशी वाढली पाण्याची पातळी...............................................................................दिनांक             पाऊस ( मिमी )     एकुण पाऊस  ( मिमी )        टक्केवारी १)  ७ जुलै          १३२                     ७२.९                                           ३१ २) १० जुलै        ६४                       ८८.३                                             ३९३)११ जुलै          ८५                     ९६.५                                            ४३४) १२ जुलै        १४.८                    ११०८                                              ४६५) १३ जुलै        १४९                      १२०६                                             ४९.९०...............................................................

टॅग्स :mavalमावळPavna Nagarपवना नगरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरणRainपाऊसlonavalaलोणावळा